कोल्हापूर: जिल्ह्यात कोरोना संसर्गापेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीवर गेले आहे. बरे होण्याची टक्केवारीदेखील ९४ टक्क्यांवर पोहोचली आहे. शनिवारी नवे ५६२ रुग्ण आढळले तरे तब्बल १०४६ जण बरे झाले. आता फक्त ६ हजार ७१९ जणच कोरोनावरील उपचार घेत आहेत. दरम्यान, अजूनही मृत्यूची संख्या १५ आहे, त्यातही ६० वर्षांवरील ज्येष्ठांचे प्रमाण जास्त आहे.
जिल्ह्यात महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यापासून कोरोना संसर्गाचे प्रमाणही कमी होताना दिसत आहे. सलग आठवडाभर रुग्णसंख्या ३०० ते ७०० च्या घरातच असल्याने पूर नियंत्रणात गुंतलेल्या यंत्रणेलाही थोडासा दिलासा मिळाला आहे. तरीदेखील पूर ओसरेल, गावांचे जनजीवन जसजसे पूर्वपदावर येईल तशा कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात येत आहे. शनिवारी १२ हजार १५८ तपासण्या झाल्या, यातील केवळ ५६२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
कोल्हापूर शहराच्या तुलनेत करवीर तालुका रुग्णसंख्या व मृत्यूमध्येही आघाडीवर आहे. सर्वाधिक १०१ रुग्ण व १३ मृत्यूपैकी ४ मृत्यू हे एकट्या करवीर तालुक्यातील आहेत. शहरात ९८ रुग्ण असून मृत्यूही ३ आहेत.
आजचे मृत्यू
कोल्हापूर शहर : ०३ सदर बजार, देवकर पाणंद, मंगळवारपेठ,
करवीर: ०४ उचगाव , हलसवडे, उजळाईवाडी, कुडित्रे,
पन्हाळा: ०१ आवळी,
कागल: ०२ मुरगुड, साके
शिरोळ: ०१ टाकवडे,
हातकणंगले: ०१ चंदूर,
आजरा: ०१ साळगाव,
इतर जिल्हा: ०२ चाफेड (देवगड), पोमेवाडी (रत्नागिरी)