यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महा वितरण कंपनीने वीज ग्राहकांना वीज तोडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत. विद्युत पुरवठा खंडित करू नये. कर्नाटक, बिहार, मध्यप्रदेश, दिल्ली येथे वीज बिले माफ केली आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रात ही करावी. महाआघाडीने वीज माफी करणार असे सांगत सहा महिने टोलवाटोलवी केली आहे. या विरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.
यावेळी अध्यक्ष जगन्नाथ माने, युवा मोर्चाचे अध्यक्ष रणजितसिंह पाटील तालुका विस्तारक जिनेंद्र देसाई, तालुका उपाध्यक्ष बंडा गोंदकर, उमा ठिंगळे, सुनील लाड, बाळू खरात, सचिन सलगर, प्रकाश पाटील, राजू वायदंडे, युवराज मिरजे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ:
पेठवडगाव : कोरोना काळातील वीज बिले माफ करावीत असे निवेदन भाजपच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. यावेळी जगन्नाथ माने, जिनेंद्र देसाई, तालुका उपाध्यक्ष बंडा गोंदकर, सुनील लाड, उमा ठिंगळे आदी उपस्थित होते.