धामोड/कोल्हापूर : धामोड ता. राधानगरी ) येथील स्थानिक रहिवाशी 'कोरोना पॉझीटीव्ह ' आढळले. यामुळेपूर्ण तुळशी खोऱ्यात एकच खळबळ उडाली .
या व्यक्तीच्या संपर्कातील २१ जणांचे स्वॅब राधानगरी कोविड सेंटर येथून पाठवले असून त्यांच्या अहवाला नंतर पूढील कारवाई करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ . शेट्ये यांनी सांगितलव .
तर गेल्या कित्येक दिवसापासून शिथील असणारे लॉक डाऊन ग्रामपंचायत प्रशासनाने कडक केले असून ते पाच दिवस राहणार आहे .
कोल्हापूर येथे निमोनियाचे उपचार घेण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला कोरोना असल्याची बातमी सकाळी धामोड मध्ये पसरताच संपूर्ण तुळशी परिसरात स्वयंघोषित लॉक डाऊन सदृश्य वातावरण अवघ्या काही मिनीटात तयार झाले . संपूर्ण बाजारपेठ क्षणार्धात बंद झाली .
धामोड हे तुळशी खोरा पंचक्रोशीतील प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे . येथे संपूर्ण तुळशी खोऱ्यातील चाळीस ते पन्नास खेडेगावातील लोक जीवनावश्यक वस्तू , बँका व अन्य कारणासाठी येत असतात . सकाळी कोरोनाची एंट्री झाल्याची बातमी पसरताच इथले सर्व व्यवहार बंद झाले .
या व्यक्तिला सतत ताप येऊ लागल्याने त्यांने भोगावती येथील खासगी डॉक्टरांना दाखवल्यानंतर निमोनियाची लक्षणे आढळून आली व पुढील उपचारासाठी ती व्यक्ती कोल्हापूर येथे दाखल झाली .
तेथे त्यांना कोरोना चाचणी करण्याचा आग्रह केल्या नंतर तपासणीत सदर व्यक्तीचा अहवाल अहवाल पॉझीटिव्ह ' आला .
संबधित व्यक्ती गेल्या आठ दिवसापासून कोल्हापूर येथे उपचार घेत आहे . त्याचा गावाशी संपर्क आलेला नाही . तरीही खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने हा परीसर शील केला आहे .