कोल्हापूर : महानगरपालिका व पोलीस यांच्यावतीने संयु्क्तपणे सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत गुरुवारी १९६ व्यक्तींवर कारवाई करुन ३१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबद्दल महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.
-अशी झाली कारवाई -
- विनामास्क कारवाई - १८१ व्यक्ती, दंड - १८ हजार १००,
- सोशल डिस्टन्स कारवाई -१२ व्यक्ती, दंड - ७५००
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कारवाई - २ व्यक्ती, दंड - ४००