कोल्हापूर- हातकणंगले तालुक्यातील टोप येथील मृत रुग्ण वसंत गणपती पाटील ( वय ७५) यांचा कोरोनाबाबतचा अहवाल निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.मृत पाटील हे मधुमेहाने आजारी होते. काल मध्यरात्री त्यांना उपचारासाठी सीपीआरला दाखल केले होते. त्यांना श्वसनाचा गंभीर त्रास, मधुमेह व न्युमोनिया झाल्याचे निष्पण झाले. या पूर्वीच ते अर्धांगवायूने आजारी असून उपचार घेत होते.
त्यांचा बाधित देशात, शहरात प्रवास झालेला नव्हता तसेच कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क झाल्याचा इतिहास नव्हता. तरीही रुग्णाचे वय विचारात घेवून तसेच न्युमोनिया आजार असल्याने सध्याची कोरोना साथ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. उपचार सुरु असताना सकाळी 8-30 वा त्यांचा मृत्यू झाला.
बाधित रुग्णाच्या कुटुंबातील कुटुंबातील इतर चार सदस्यांसह एकूण ३१ संशयितांचा अहवाल निगेटिव्हकोल्हापूर- पुण्याहून आलेल्या मंगळवार पेठेतील कोरोना संसर्गिताच्या कुटुंबातील एका महिला सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला. कुटुंबातील इतर चार सदस्यांसह अन्य ३१ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.पुण्याहून मंगळवार पेठेत आलेल्या प्रवाश्याला यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचेही स्वब नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यामध्ये एका महिला सदस्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज निष्पन्न झाले. कुटुंबातील इतर चार सदस्यांसह अन्य एकूण ३१ संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.परंतु, खबरदारीची उपाय योजना म्हणून
व्यक्तीच्या कुटुंबातील ४ निगेटिव्ह सदस्य व उर्वरीत निगेटिव्ह सदस्यांना स्वतंत्ररित्या संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. पुढील १४ दिवस अलगीकरणात राहून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, आशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.