पट्टणकोडोली गावामध्ये कोरोनाचा संसर्ग जोरात वाढत आहे. दररोज नवीन रुग्ण आढळून य़ेत आहेत. त्यामुळे शासनाचे कोरोना संसर्गाच्या बाबतीतील नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचना अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गावामध्ये कडक नाकाबंदी करून विनाकारण फिरणा-या ५० मोटारसायकली जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. तर पोलीस आणि ग्रामपंचायतीमार्फत विनाकारण फिरणा-यांची अॅंंटिजन चाचणी करण्याची मोहीम राबविण्यात अाली. यामध्ये तीस जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी तिघांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळले.
पट्टणकोडोलीत विनाकारण फिरणा-यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:18 AM