निवेदनात, शहापूर गावची ५० हजार लोकसंख्या असून, या ठिकाणी खंजिरे इस्टेटसह परिसरात कारखाने व सायझिंग आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहण्यास आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहापूर हा भाग हॉटस्पॉट झाला असून, कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. सर्वाधिक ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, परिसरामध्ये हॉस्पिटल नसल्याने गरीब रुग्णांना उपचार घेण्यास मर्यादा येत आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने अनेकजण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात सचिन पोवार, राकेश वाझे, अतिष जाधव, विनायक संकपाळ, सुरेश रावळ, किरण पाटील आदींचा समावेश होता.
फोटो ओळी
१४०५२०२१-आयसीएच-०१
शहापूर प्राथमिक शाळेमध्ये कोरोना उपचार केंद्र सुरू करावे, या मागणीचे निवेदन नगरसेवक किसन शिंदे यांनी मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांना दिले.