शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

Corona vaccine Kolhapur : शिरोळवर जिव्हाळा, करवीरकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 1:49 PM

Corona vaccine Kolhapur :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे करवीर तालुक्यात सापडले आहेत. आताही जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण याच तालुक्यात असताना लस वाटपात मात्र सापत्नभावाची वागणूक आरोग्य विभागाकडून दिली जात आहे.

ठळक मुद्देलस वाटपात सापत्नभावाची वागणूक सर्वाधिक बाधित असतानाही लस कमी

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे करवीर तालुक्यात सापडले आहेत. आताही जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण याच तालुक्यात असताना लस वाटपात मात्र सापत्नभावाची वागणूक आरोग्य विभागाकडून दिली जात आहे. लोकसंख्या व रुग्ण पाहता आरोग्य राज्यमंत्र्यांच्या शिरोळ तालुक्यावर आरोग्य विभागाचा जरा अधिकच जिव्हाळा असून, करवीरकडे मात्र कानाडोळा केल्याने संतप्त भावना उमटत आहेत.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेली तीन महिने सगळ्यांनाच मेटाकुटीला आणले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहेच, त्याचबरोबर लसीकरणही महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने मोफत लसीकरण सुरू केले आहे. मात्र, त्याचा पुरवठा आणि डोस घेणाऱ्यांची संख्या पाहिली, तर फार मोठी तफावत आहे. मुळात सरकारकडून लस कमी मिळत आहेत. त्यातच लस वाटपात असमानता होत असल्याने सामान्य माणसाला लसीपासून वंचित राहावे लागत आहे.कोल्हापूर जिल्ह्यासाठी रविवारी लसीचे ४५ हजार डोस आले. त्याचे वाटप आरोग्य यंत्रणेने केले असून, यामध्ये हातकणंगले तालुक्याला सर्वाधिक ९,२००, शिरोळ तालुक्यासाठी ४,१६०, तर करवीर तालुक्याला ४,५६० डोस देण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून करवीर तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. रविवारीही तब्बल ५१४ रुग्ण एकट्या करवीरमधील आहेत. मात्र, त्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीविना नागरिकांना रांगेतूनच परत जावे लागत आहे.येथेही शिरोळलाच झुकते मापसरकारी यंत्रणेकडून कोरोनाची मोफत लस मिळत नसल्याने आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयाला लस देण्यास परवानगी दिली आहे. येथेही हातकणंगले व शिरोळ तालुक्यांना प्रत्येकी बारा रुग्णालयांना परवानगी दिली आहे, त्या तुलनेत करवीरमधील पाच रुग्णालयांचा समावेश आहे.

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कोल्हापुरात मात्र वाढत आहे. रुग्णसंख्या अटोक्यात आणण्याबरोबरच लसीकरणात ते अपयशी ठरले आहेत. ज्या तालुक्यात रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे तरी जादा डोस देणे अपेक्षित असताना, येथेही दुजाभाव करणे योग्य नाही.-बाबासाहेब देवकर,माजी सदस्य, जिल्हा परिषद

रविवारची तालुकानिहाय रुग्णसंख्या आणि लसीचे डोसतालुका            रुग्ण         आज मिळाला डोस

  • आजरा          १०८                 १,७१०
  • भुदरगड         ९०                  १,८९०
  • चंदगड            २०                  २,५६०
  • गडहिंग्लज    ११२                 ३,२८०
  • गगनबावडा       ३                    ५००
  • हातकणंगले   ३२८               ९,२००
  • कागल            १६७               २,५८०
  • करवीर           ५१४               ४,५६०
  • पन्हाळा          १३८              २,६४०
  • राधानगरी       १३६              २,६६०
  • शाहूवाडी          ७४                २,९२०
  • शिरोळ           २२६                ४,१६०
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर