कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्वेक्षण मोहिमेत तिसऱ्या टप्यामध्ये आतापर्यंत एक लाख २७ हजार ५३७ घरांचे सर्व्हेक्षण केले असून, यामध्ये पाच लाख ५३ हजार दोन नागरिकांची तपासणी केली आहे. यामध्ये शनिवारी नऊ हजार ३८३ घरांचे सर्व्हेक्षण केले असून, ३९ हजार ९९६ नागरिकांची तपासणी केली. ११ नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले. यामध्ये पोलीस लाईन, ताराबाई पार्क, मंगळवार पेठ, जवाहरनगर, साठमारी परिसर, पाटाकडील तालीम, तुळजाभवानी हौसिंग सोसायटी, महाराष्ट्रनगर; जीवबा नाना पार्क, गुलाबनगर, महादेवनगर, मगदूम गल्ली, राजबक्ष दर्गा, आझाद गल्ली, लक्ष्मीपुरी, कारंडे मळा, कदमवाडी, सदर बझार, पाटोळेवाडी, साकोली कॉर्नर, शहाजी वसाहत, न्यू कॉलेज परिसर, स्वाती कॉम्प्लेक्स, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, माकडवाला वसाहत, रुक्मिणीनगर, बाजारगेट, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, तोरस्कर चौक, दुधाळी, रंकाळा स्टँड, रामानंदनगर, सुभाषनगर, जरगनगर, नेहरूनगर, म्हाडा कॉलनी, राजेंद्रनगर, ताराराणी कॉलनी या परिसराचा समावेश आहे.
corona virus तिसऱ्या टप्प्यात साडेपाच लाख नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 1:58 PM
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्वेक्षण मोहिमेत तिसऱ्या टप्यामध्ये आतापर्यंत एक लाख २७ हजार ५३७ घरांचे सर्व्हेक्षण केले ...
ठळक मुद्देएक लाख २७ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण