शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

corona virus : कोल्हापुरात १०१२ कोरोना रुग्ण ; दोघांचा मृत्यू, दिवसात २९ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 11:09 AM

सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने मंगळवारी दोन बळी घेतले. मृत झालेल्या व्यक्ती या इचलकरंजी शहरातील असून आतापर्यंतच्या मृतांची संख्या १५ वर पोहोचली. जिल्ह्यात रोज कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी रात्रीपर्यंत २९ रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णांची संख्या आता १०१२ वर जाऊन पोहोचली. त्यांपैकी ७६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

ठळक मुद्देकोल्हापुरात १०१२ कोरोना रुग्ण ; दोघांचा मृत्यू, दिवसात २९ नवे रुग्ण गोकुळशिरगांवात एकाच कुटुंबातील पाच, शिरोळमध्ये तब्बल नऊ नवे रुग्ण

कोल्हापूर : सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने मंगळवारी दोन बळी घेतले. मृत झालेल्या व्यक्ती या इचलकरंजी शहरातील असून आतापर्यंतच्या मृतांची संख्या १५ वर पोहोचली. जिल्ह्यात रोज कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी रात्रीपर्यंत २९ रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णांची संख्या आता १०१२ वर जाऊन पोहोचली. त्यांपैकी ७६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.कोल्हापूर जिल्हा सुरुवातीच्या काळात सुरक्षित होता; परंतु पुणे, मुंबई तसेच रेड झोनमधील अन्य शहरांतून मूळचे कोल्हापूरवासीय येथे येऊ लागले तशी कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. जरी संख्या वाढत जात असली तर संबंधित रुग्ण आधीच क्वारंटाईन होत असल्यामुळे त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु इचलकरंजी शहरात मात्र रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.जिल्ह्यात कोरोनाने आजअखेर १३ बळी घेतले. मंगळवारी ही संख्या आणखी दोनने वाढली. इचलकरंजी येथील एका ७३ वर्षांच्या वृद्धावर कोल्हापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. निदान होण्यापूर्वीच सोमवारी (दि. ६) रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले होते. मंगळवारी त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. तर इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७५ वर्षांच्या कोरोनाबाधित महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला.मंगळवारी रात्रीपर्यंत आलेल्या अहवालापैकी तब्बल २८ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यामध्ये शिरोळ तालुक्यात नऊ, इचलकरंजी शहरात पाच, चंदगड तालुक्यात तीन, करवीर तालुक्यात सात, आजरा तालुक्यात दोन तर गडहिंग्लज तालुक्यात एक रुग्णांचा समावेश आहे. तर एक रुग्ण रत्नागिरीचा आहे.इचलकरंजीत चार पुरुषांसह एक महिला बाधितइचलकरंजीतील चार पुरुष व एक महिला अशा पाच जणांचा समावेश आहे. संबंधित रुग्ण स्वामीमळा, मेनरोड संत चौक, सुमेरु बिल्डींग, सातपुते गल्ली, भाग्यरेखा टॉकीज परिसरातील राहणारे आहेत. एक रुग्ण अब्दुललाटचा, एक रुग्ण इंगळी (हातकणंगले) तर एक जण रत्नागिरी येथील आहे.गोकुळशिरगांवात पाच रुग्णकरवीर तालुक्यात आढळलेल्या सात रुग्णांपैकी गोकुळ शिरगांव येथील पाच जणांचा समावेश आहे. सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. शनिवारी सापडलेल्या रुग्णाच्या घरातीलच हे सर्वजण आहेत. त्यामध्ये या रुग्णाची पत्नी, आई, वडील, भावजय यांचा समावेश आहे. त्यामुळे एसटी कॉलनी व म्हसोबा माळवाडी हा परिसर सील करण्यात आला. कणेरी व चापोडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.शिरोळमध्ये सर्वांधिक रुग्णकोरोनाने मंगळवारी शिरोळला धक्का दिला. शिरोळमध्ये सात तर तालुक्यात कुरुंदवाड चिप्री येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. त्यामुळे शिरोळमध्येही स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली.तालुका निहाय आकडेवारी अशी -तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- ९४, भुदरगड- ७७, चंदगड- ११७, गडहिंग्लज- ११३, गगनबावडा- ७, हातकणंगले- १८, कागल- ५८, करवीर- ३७, पन्हाळा- २९, राधानगरी- ७३, शाहूवाडी- १८७, शिरोळ- २१, नगरपरिषद क्षेत्र- १००, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ५९, जिल्हा व राज्यातील २१ (पुणे -२, सोलापूर- ३, मुंबई- ४, नाशिक- १, कर्नाटक- ७, आंध्रप्रदेश- १ आणि सातारा- २,रत्नागिरी-१) असे इतर असे मिळून एकूण १०१२ रुग्ण.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर