शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

corona virus : जिल्ह्यातील सर्वेक्षणातून १४८ जण निघाले पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 4:05 PM

माझे कुटुंब - माझी जबाबदारी या शासनाच्या सर्वेक्षणाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून एका आठवड्यामध्ये १७ लाख ८६ हजार ९६४ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातून २२०४ जणांनी पुढील उपचार आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले असून, १४८ जणांच्या स्रावचाचणीनंतर ते पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्वेक्षणातून १४८ जण निघाले पॉझिटिव्ह२२०० हून अधिक जणांना उपचार घेण्याच्या सूचना

कोल्हापूर : माझे कुटुंब - माझी जबाबदारी या शासनाच्या सर्वेक्षणाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून एका आठवड्यामध्ये १७ लाख ८६ हजार ९६४ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातून २२०४ जणांनी पुढील उपचार आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले असून, १४८ जणांच्या स्रावचाचणीनंतर ते पॉझिटिव्ह आले आहेत.शासनाच्या विविध विभागांच्या सहकार्याने १५ सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला सोमवारी सात दिवस पूर्ण झाले आहेत. या सर्वेक्षणामध्ये ५५७ जणांना ह्यसारीह्ण हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे; तर एक लाख २३ हजार ९५० जणांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारखे आधीचे आजार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ४६५८ जणांना ताप, सर्दीची लक्षणे आढळली आहेत.नागरिक आपणहून स्राव तपासणीसाठी जात नसल्याने कोरोना संसर्ग वाढतच राहतो आणि पॉझिटिव्ह असलेल्या परंतु त्याची माहिती नसलेल्या रुग्णांमुळे संसर्ग होण्यास मदतच होते. म्हणूनच अशा पद्धतीने दोन टप्प्यांत सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

यातील पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. यातील अनेक संशयितांचे स्राव घेण्यात आले. यातील १४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याची तपासणी झाली नसती तर त्यांच्याकडून घरच्या आणि समाजातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला असता. त्यामुळे ही सर्वेक्षण मोहीम साहाय्यभूत ठरत आहे.                  सारी रुग्ण   ताप रुग्ण    जुने आजार     रुग्ण संदर्भित रुग्ण     पॉझिटिव्ह

  • ग्रामीण  ४०५            ४०८७             ८४४०१                   १४८६                           ९२
  • शहरी       ५२              १२५             १५३०९                       ८७                           १५
  • कोल्हापूर शहर १००   ४४६              २४२४०                     ६३१                           ४१

एकूण            ५५७          ४६५८             १२३९५०               २२०४                      १४८

 

शासनाने अतिशय विचारपूर्वक हे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यामुळे अनेक विभाग एकत्रित येऊन घरोघरी तपासणी करीत आहेत. त्यामुळे लक्षणे असणाऱ्यांचे वेळीच स्राव घेतले जात आहेत. परिणामी संभाव्य कोरोनाचा संसर्ग वाढण्यास आळा घालणे शक्य होणार आहे.- अमन मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर