कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी २३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील ४, करवीर तालुक्यातील २, चंदगड १०, गडहिंगलज २, आजरा ३, शिरोळ १, कोल्हापूर शहर १ या नागरिकांच्या अहवालांचा समावेश आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या २३ झाली आहे. अशातच जिल्ह्यातील एका आमदारांच्या चिरंजीवाचा आणि नातवाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
कारण हे आमदार दोन दिवसांपूर्वीच्या कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे प्रशासनातील प्रमुख अधिकारीही धास्तावले आहेत. यातील एका खासदारांनी तातडीने आपली तपासणी करून घेतली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सरनाईक कॉलनीत भीती कायम
जवाहरनगर, सरनाईक कॉलनी येथील एका विक्रेत्यास कोरोना झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. जवाहरनगर, आर.के.नगर या परिसरातील मोठ्या संख्येने ग्राहक त्या विक्रेत्याच्या संपर्कात होते. विक्रेत्याकडून जर कोणी काही माल खरेदी केला असल्यास संबंधितांनी स्वत:हून पुढे येऊन स्रावाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.