कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. रविवारी दिवसभरात २७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मृतांत कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील प्रत्येकी सातजणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त बळींची संख्या आता ८७५ वर पोहोचली आहे; तर नव्या ८५४ कोरोनाग्रस्तांची भर पडली. दिवसभरात ५११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण रुग्णसंख्या तब्बल २८,८४३ झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतच आहे. हे वाढते प्रमाण प्रशासनाला चिंतन करायला लावणारे आहे. लॉकडाऊन संपला, ई-पास रद्द झाले, परिणामी जिल्ह्यात प्रवेश करणारे तपासणी नाके उठवले आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू झाली आहे. जणू कोरोना गेलाच अशा पद्धतीने नागरिक रस्त्यांवर वावरू लागले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे. परिणामी, कोरोनाच्या महामारीचा धोका वाढू लागला आहे.रविवारी दिवसभरात तब्बल ८५४ नवे रुग्ण वाढले, त्यामध्ये कोल्हापूर शहरात ३०१, हातकणंगले तालुक्यात १०१ नव्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २८,८४३ वर पोहोचली आहे. दिवसभरात २६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मृत्यूंची संख्या ८७५ वर पोहोचली आहे. कोल्हापूर शहरातील मृत्यूंची संख्या २२८ वर, तर इचलकरंजी शहरातील संख्या १७७ वर पोहोचली आहे. दिवसभरात ५११ जणांना डिस्चार्ज दिला.५१०६ पॉझिटिव्ह रुग्ण घरात क्वारंटाईनजिल्ह्यात ८१ ठिकाणी कोविड सेंटर असली तरीही ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव सुरूच राहिली. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेले सुमारे ५१०६ रुग्ण सध्या घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरात ३१००, नगरपालिका हद्द व ग्रामीण भागात २००६ जणांचा समावेश आहे.दिवसभरात ३२०६ चाचणी अहवाल प्राप्तरविवारी दिवसभरात एकूण ३२०६ चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये २७३३ स्राव चाचणी अहवालांपैकी २२१४ अहवाल निगेटिव्ह, तर ४६१ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. शिवाय ५७३ ॲन्टिजेन चाचण्यांपैकी ४२० चाचणी अहवाल निगेटिव्ह, तर १५३ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. शिवाय खासगी रुग्णालयातून सुमारे २४० अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दिवसभरात एकूण ८५४ अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात ११५१ जणांची स्रावचाचणी, तर ६६५ जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.दिवसभरातील कोरोनाग्रस्तांचा मृत्यूकोल्हापूर शहर : वय ७४ / पुरुष- नागाळा पार्क, ७२/ पुरुष-फुलेवाडी, ५८/महिला- लक्षतीर्थ वसाहत, ८०/महिला- नागाळा पार्क, ७५/ पुरुष- मुक्त सैनिक वसाहत, ६३/पुरुष- सरनाईकनगर, ६५/पुरुष- शिवाजी पेठ.करवीर तालुका : ७१/पुरुष- नागदेववाडी, ५५/महिला व ८८/पुरुष- गडमुडशिंगी, ४७/महिला व ४०/पुरुष -मणेर मळा (उचगाव), ६५/पुरुष-बाचणी, ५३/पुरुष-सावरवाडी. शिरोळ तालुका : ५७/पुरुष-टाकवडे, ७५/महिला-दत्तवाड, ५४/महिला-यादवनगर, ६३/पुरुष-शिरोळ, ७४/पुरुष-अब्दुललाट.इचलकरंजी शहर : ४५/महिला- इचलकरंजी, ८०/पुरुष-पंतमळा, ६४/पुरुष-गुजरी कॉर्नर.हातकणंगले : ४८/पुरुष-खोतवाडी, ७५/पुरुष- भेंडेवाडी.राधानगरी : ६७/पुरुष-टिटवडे (ता. राधानगरी).इतर जिल्हे : ५९/पुरुष-कऱ्हाड (जि. सातारा), ५८/पुरुष- सुभाषनगर (जि. सांगली).
corona virus : जिल्ह्यात २७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू,नवे रुग्ण ८५४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 2:24 PM
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. रविवारी दिवसभरात २७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मृतांत कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील प्रत्येकी सातजणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त बळींची संख्या आता ८७५ वर पोहोचली आहे; तर नव्या ८५४ कोरोनाग्रस्तांची भर पडली. दिवसभरात ५११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण रुग्णसंख्या तब्बल २८,८४३ झाली आहे.
ठळक मुद्देमृतांची संख्या ८७५ वर पोहोचली; जिल्ह्यात २७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू,नवे रुग्ण ८५४ कोल्हापूर शहर, करवीर तालुक्यात प्रत्येकी सातजणांचा मृत्यू