कोल्हापूर : खासगी रुग्णालयात नव्याने ३१० बेड वाढवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या आदेशानंतर यामध्ये वाढ झाली आहे. मात्र, रोज नव्याने शहरात दीडशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून यामधील गंभीर परिस्थिती असणाऱ्या १५ ते २० रुग्णांना वेटिंगवर राहावे लागत आहे.जिल्ह्यात आणि शहरात कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे. जिल्ह्यात रोज ५०० च्या वर नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत २६००० लोकांना या आजाराची लागण झाली. सध्या ८७५७ रुग्णांवर शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये कोरोना केअर सेंटर यांचाही समावेश आहे.
असे असले तरीही बेड मिळत नसल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. यामध्ये कोरोना नसणार यांची संख्या जास्त आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी २५ ऑगस्ट रोजी खाजगी रुग्णालयांना आठ दिवसांत आणखी ३८१ बेड वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यांनुसार त्यांनी बेड वाढविले आहेत.वाढीव ३१० बेड फुल्लआयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांनी ३८० पैकी ३१० नव्याने बेडमध्ये वाढ केली. यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात सध्या १२३० बेड झाले असून वाढीव बेडसह सर्व बेड फुल्ल आहेत. रोज १५ ते २० गंभीर रुग्ण बेडसाठी वेटिंगवर आहेत.खासगी रुग्णालयांनाही मर्यादाअपुरी जागा आणि अपुरी वैद्यकीय मनुष्यबळ यामुळे खासगी रुग्णालयांनाही बेड वाढविण्यासाठी मर्यादा आहेत. नुसतेच बेड वाढवून उपयोग नाही. येणाऱ्या सर्व रुग्णांना चांगला उपचार देणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.