शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

corona virus : आठवड्यात विविध सुविधांयुक्त ३८१ बेड उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 4:06 PM

कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे शहरातील खासगी तसेच विश्वस्त रुग्णालयांनी अतिरिक्त वैद्यकीय सुविधा एक आठवड्यात वाढवाव्यात, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई व महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित ३७ रुग्णालयांना बजावले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी व आयुक्तांचा आदेश अतिरीक्त सुविधा देण्याची ३७ रुग्णालयांवर सक्ती

कोल्हापूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे शहरातील खासगी तसेच विश्वस्त रुग्णालयांनी अतिरिक्त वैद्यकीय सुविधा एक आठवड्यात वाढवाव्यात, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई व महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित ३७ रुग्णालयांना बजावले. त्यामुळे या रुग्णालयांत आठवड्याभरात विविध सुविधांनी युक्त ३८१ बेड उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे एकूण बेडची क्षमता १३०१ इतकी होऊ शकेल.कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्याकरिता सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांचा उपचारसुद्धा मिळत नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व आयुक्तांनी मंगळवारी हे आदेश दिले.शहरात एकूण ३७ खासगी तसेच विश्वस्त रुग्णालयांतील ८० टक्के बेड आधीच जिल्हा प्रशासनाने अधिग्रहण केले आहेत. तेथे कोविड व नॉन-कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु रुग्णसंख्या वाढत असल्याने भविष्यकाळात वैद्यकीय सुविधा वाढविणे अत्यावश्यक बाब बनली आहे.सध्या ३७ खासगी व विश्वस्त रुग्णालयातून ऑक्सिजन बेड ४२६, नॉन ऑक्सिजन बेड २८४, आयसीयू बेड २१०, व्हेंटिलेटर ५६, हायफ्लो नेझल युनिट २४ एवढी वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु ती अपुरी पडत असल्याने ही क्षमता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व रुग्णालयांना मिळून अतिरक्त १०५ व्हेंटिलेटर्स, ८० हायफ्लो नेझल युनिट, २१६ ऑक्सिजन बेड, १६५ आयसीयू बेड उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. प्रत्येक रुग्णालयाने किती अतिरिक्त सुविधा वाढवायच्या हे त्यांना ठरवून दिले आहे. विशेष म्हणजे येत्या आठ दिवसांत या सर्व सुविधा संबंधित रुग्णालय प्रशासनाने स्वत:च्या फंडातून उपलब्ध करून द्यायच्या आहेत.संबंधित रुग्णालयांनी ठरवून दिलेल्या अतिरिक्त वैद्यकीय सुविधा निर्माण केल्या आहेत किंवा नाही हे पाहण्याकरिता तसेच जे रुग्णालय प्रशासन आदेशाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता अधिकारीही नियुक्त केले आहेत.

ज्या रुग्णालय प्रशासनाकडून आदेशाची अंमलबजावणी होणार नाही, त्यांच्यावर आयपीसी कलम १८८ (१८६० चे ४५) नुसार गुन्हा दाखल केला जाईल; तसेच रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यात येईल, असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.                           सद्य:स्थिती     वाढीव    एकूण (आठवड्यानंतर)

  • ऑक्सिजन बेड -          ४२६             २१६        ६४२
  • नॉन-ऑक्सिजन-          २८४             ००          ००
  • आयसीयू-                      २१०           १६५       ३७५
  • व्हेंटिलेटर व एनआयव्ही - ५६           १०५      १६१
  • एचएफएनसीएस -            २४             ८०      १०४

एकूण                              ९२०           ३८१     १३०१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर