शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे ४३४ नवे रुग्ण, २२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 7:35 PM

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती स्थिर असून सोमवारी ४३४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे सीपीआर रुग्णालय प्रशासनाकडून मिळणाऱ्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात कोरोनाचे ४३४ नवे रुग्ण, २२ जणांचा मृत्यूग्रामविकास मंत्री मुश्रीफ कोरोनामुक्त 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती स्थिर असून सोमवारी ४३४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे सीपीआर रुग्णालय प्रशासनाकडून मिळणाऱ्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्गाचा दाह कमी होत असून रुग्णसंख्या घटत चालली आहे. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात जी परिस्थिती होती, त्याच्या तुलनेत बरीच सुधारणा झाली आहे. रुग्णसंख्या पन्नास टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाचा आत्मविश्वासदेखील वाढत चालला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ४३ हजार ४४३ इतक्या रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ३२ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. केवळ कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या अद्याप म्हणावी तितकी नियंत्रणात आलेली नाही, तोच एक चिंतेचा विषय बनला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३९७ रुग्ण कोरोनाचे शिकार ठरले आहेत. दुर्दैवाने हे प्रमाण राज्याच्या पातळीवर काहीसे जादा आहे. मात्र, तरीही हे प्रमाण कमी करण्याकरिता जिल्हा व आरोग्य प्रशासन कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे.ग्रामविकास मंत्री मुश्रीफ कोरोनामुक्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सोमवारी कोरोनामुक्त झाले. कोरोना महामारीतदेखील सातत्याने जनतेत मिसळून काम करण्याची त्यांची सवय अंगलट आली. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातून ते पूर्णत: बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने ही आनंदाची पर्वणी होती. आतषबाजी करत रांगोळ्या काढून, फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर