कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या ४९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. याच वेळी तीन अत्यवस्थ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील भुदरगड, गडहिंग्लज, गगनबावडा, करवीर व पन्हाळा तालुक्यांत एकाही नवीन रुग्णांची नोंद झाली नाही. तर आजरा, राधानगरी तालुक्यांत प्रत्येकी एक, कागल, शाहूवाडी तालुक्यांत प्रत्येकी दोन, शिरोळ तालुक्यात चार, तर कोल्हापूर शहरात २० नवीन रुग्णांची नोंद झाली. ५३६ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यामध्ये ४९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.सोमवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता, पण मंगळवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील ५० वर्षीय पुरुष, शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील ७५ वर्षीय महिला, तर करवीर तालुक्यातील कळंबा येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या ४८ हजार २७२ झाली असून, त्यापैकी ४५ हजार ७०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९२५ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.तालुकानिहाय रुग्णसंख्या अशी -
आजरा - ८४६, भुदरगड - १२०८, चंदगड - ११७७, गडहिंग्लज - १४०८, गगनबावडा - १४३, हातकणंगले - ५२३९, कागल - १६४२, करवीर - ५५५०, पन्हाळा - १८३७, राधानगरी - १२१४, शाहूवाडी - १३२५, शिरोळ - २४६४, नगरपालिका हद्द - ७३५४, कोल्हापूर शहर १४ हजार ६३७, इतर जिल्हा - २२२८.