शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे ५४६ नवीन रुग्ण, नऊ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 6:40 PM

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ५४६ नवीन रुग्ण आढळून आले तर नऊ रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गेल्या काही दिवसापासून मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या २० ते २५ इतकी असायची ती शनिवारी नऊपर्यंत खाली आल्याने कोल्हापूरकरांना रुग्ण संख्या कमी होण्याबरोबरच आणखी एक दिलासा मिळाला.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचे ५४६ नवीन रुग्ण, नऊ जणांचा मृत्यूमृत्यूची संख्याही घटल्याने आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ५४६ नवीन रुग्ण आढळून आले तर नऊ रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गेल्या काही दिवसापासून मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या २० ते २५ इतकी असायची ती शनिवारी नऊपर्यंत खाली आल्याने कोल्हापूरकरांना रुग्ण संख्या कमी होण्याबरोबरच आणखी एक दिलासा मिळाला.जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ९८३ वर गेली असून मृत्यूंची संख्या १३६२ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र असून शनिवारी मृत्यूची संख्याही घटल्याने आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला.रुग्ण संख्या कमी होत चालली असल्याने कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेणे व त्याची तपासणी करण्याचे प्रमाण सुध्दा घटले आहे. मागच्या तीन दिवसात चाळीस ते पन्नास टक्क्यांनी हे प्रमाण घटले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत चालला आहे.

ऑक्सीजन बेड मिळत नाहीत, व्हेंटिलेटर्स मिळत नाहीत या तक्रारी देखिल आता कमी झाल्या आहेत. जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने रोज कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे गोंधळलेली परिस्थिती हळुहळू सुधारत चालली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर