शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

CoronaVirus :कोल्हापुरातील ६९ टक्के रुग्ण उपचारानंतर घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 10:42 AM

शहरातील कोरोनाग्रस्त डॉक्टरच्या रुग्णालयातील रिसेप्शनिस्टलाही कोरोना झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यामुळे त्या रुग्णालयात गेल्या महिन्याभरात गेलेल्या रुग्णांच्या पोटात गोळा आला आहे. सोलापूरचे नातेवाईक कोल्हापुरात उपचारासाठी आल्यावर या डॉक्टरचा त्यांच्याशी संपर्क झाल्याचा संशय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६९ टक्के रुग्ण बरे होऊन गेले असून, ३० टक्के उपचार घेत आहेत, तर १ टक्का रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरातील ६९ टक्के रुग्ण उपचारानंतर घरीदवाखान्यातील रिसेप्शनिस्टलाही कोरोना : सोलापूरचे कनेक्शन

कोल्हापूर : शहरातील कोरोनाग्रस्त डॉक्टरच्या रुग्णालयातील रिसेप्शनिस्टलाही कोरोना झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. त्यामुळे त्या रुग्णालयात गेल्या महिन्याभरात गेलेल्या रुग्णांच्या पोटात गोळा आला आहे. सोलापूरचे नातेवाईक कोल्हापुरात उपचारासाठी आल्यावर या डॉक्टरचा त्यांच्याशी संपर्क झाल्याचा संशय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६९ टक्के रुग्ण बरे होऊन गेले असून, ३० टक्के उपचार घेत आहेत, तर १ टक्का रुग्णांचा मृत्यू झाला आहे.शहरातील रंकाळा टॉवर परिसरातील खासगी रुग्णालयातील ३२ वर्षांच्या डॉक्टरचा अहवाल रविवारी (दि. ७) पॉझिटिव्ह आला होता. त्याच रुग्णालयातील आणि इतर संपर्कात आलेल्या ६० जणांपैकी ५९ अहवाल निगेटिव्ह आले असून, रिसेप्शनिस्टचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे.या रिसेप्शनिस्टचे माहेर बुधवार पेठेत आहे. याच ठिकाणी त्या राहत होत्या. अंबाई टँक परिसरातील घरातही त्या गेल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवार पेठेतील या महिलेच्या घरातील सदस्यांचा बाहेर वावर असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात दिवसभरात ४ नवे रुग्ण सापडले असून, एकूण संख्या ६८४ वर गेली आहे. दिवसभरामध्ये १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, एकूण ४७२ रुग्ण बरे झाले आहेत, तर आठजणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर