शहरं
Join us  
Trending Stories
1
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
2
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
3
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
4
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
5
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
6
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
7
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
8
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
9
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
11
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
12
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
13
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
14
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
15
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
16
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
17
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
18
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
19
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
20
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'

corona virus : खाजगी रुग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 3:13 PM

भितीपोटी खाजगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

ठळक मुद्देखाजगी रुग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईकोडोली ग्रामपंचायत कोरोना समितीचा निर्णय

कोडोली- कोडोली ( ता. पन्हाळा ) येथे कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेवून भितीपोटी खाजगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. ग्रामसेवक ए वाय कदम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना दक्षता समितीची बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेणेत आला.कोडोलीत सध्या कोरोना रूग्णाची संख्या दिवंसे दिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे सध्या ऊन पाऊस मुळे वातावरणात काही प्रमाणात बदल झाल्यामुळे नेहमीप्रमाणे अन्य थंडी,ताप, खोकला असणारे रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. कोडोलीतील ३५ खाजगी रुग्णालयापैकी काही रूग्णालये चालू आहेत. अन्य रुग्णालयाचे बाह्यरुग्ण विभाग चालू आहेत परंतु डॉक्टर जागेवर नसतात असे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे.

सध्या कोरोनाच्या भितीपोटी डॉक्टरही क्वांरटाईन झाले आहेत. परंतु डॉक्टर किती दिवस क्वांरटाईन असणार असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे वैद्यकिय सेवा बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांना नोटीस देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय कोरोना दक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला.|सध्या कोडोलीत कोरोना बाधिताची संख्या २६७ आहे तर १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोडोली ग्रापंचायत कार्यालयात तातडीने कोरोना दक्षता समितीची बैठक ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमे अंतर्गत शिक्षक व अशा सेविका यांची १३ पथके नेमण्यात आली आहेत प्रत्येक कुटुंबाचा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. लक्षणे दिसणाऱ्या लोकांनी तातडीने आपला स्वॅब तपासणीस द्यावा, तोंडावरती मास्क न लावणाऱ्या ग्राहकांना दुकानदारानी दुकानात प्रवेश देऊ नये याचाही निर्णय घेण्यात आला.

यावेळी माजी सरपंच शंकर पाटील ,नितीन कापरे ,माजी उपसरपंच निखील पाटील, तलाठी अनिल पोवार माणिक मोरे मानसिंग पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष निवास पाटील, व्यापारी असो.चे अध्यक्ष बाबासो पाटील, उपाध्यक्ष सूरज शहा, यासह कोरोना दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर