कोल्हापूर : कोरोना रुग्णांकडून भरमसाट बिल न घेता शासकीय दर निश्चित केल्याप्रमाणे आकारणी करावी, अशा सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरातील २४ खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. शासकीय दरपत्रक रुग्णालयात लावण्याची सक्ती केली आहे.राज्य शासनाने ३१ मे २०२० रोजी खासगी रुग्णालयाच्या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांसंदर्भात नोटिफिकेशन काढले आहे. त्यानुसार कोविड तथा नॉन-कोविड रुग्ण त्यांच्याकडे दाखल झाल्यानंतर त्यांनी आकारणी करावयाचे दर निश्चित केले आहेत. त्या दरानुसार त्यांनी रुग्णांकडून फी आकारणी करण्याबाबत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्व खासगी रुग्णालयांना शासन निर्णयाप्रमाणे फी आकारणीबाबत कळविले आहे.
सदरच्या फीआकारणी संदर्भात महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण केल्यानंतर रुग्णांकडून फी वसूल करून घ्यावी. याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांचे तंतोतंत पालन व्हावे आणि रुग्णांच्या माहितीकरिता त्यांनी त्यांच्या रुग्णालयाच्या नोटीस बोर्डावर परिपत्रकाप्रमाणे प्रकटन करणे करावे असे खासगी रुग्णालयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.८० टक्के बेड आरक्षितप्रशासनाकडून निश्चित केलेल्या ८० टक्के बेडसाठी शासन निर्देशित दराप्रमाणे रुग्ण फी आकारण्यात यावी. राहिलेल्या २० टक्के बेडसाठी जी रुग्णालये महात्मा जोतिबा फुले सारख्या योजनेत समाविष्ट असतील, त्यांना योजनेनुसार कमीत कमी दर आकारणी बंधनकारक राहील.निश्चित केलेले प्रमुख दरवॉर्ड प्रतिदिवस दर
- जनरल वॉर्ड ४०००
- आय सी यू ७५००
- आय सी यू व्हेंटिलेटरसह ९०००