कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेड आणि रुग्णांवरील उपचाराबाबत माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी म्हणून सीपीआर रुग्णालयामधील प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामुळे सीपीआरमध्ये रुग्णांना चांगली सुविधा मिळणार आहे; तसेच कोरोना रुग्णांसाठी बेडबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी सीपीआरमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची उपाययोजना करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, याची पाहणी पालकमंत्री, अधिष्ठाता, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूम या ठिकाणी करता येणार आहे.
या सीसीटीव्हीमुळे कुठल्या ठिकाणी किती बेड उपलब्ध आहेत, हे समजणार आहे. या रुग्णांची तपासणी तसेच त्यांच्यावर वैद्यकीय उपचार होतात की नाही, हेही समजणार आहे. ह्यसीपीआरह्णमधील तज्ज्ञ डॉक्टरांना देण्यात आलेल्या सेवेनुसार ते रुग्णांना तपासत आहेत का, हेही समजणार आहे.