तानाजी पोवारकोल्हापूर : जुलै महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १०० जण कोरोनाचे बळी पडले, तर तीन हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह वाढले. जुलै महिन्याचे दिवस पालटतील तशी झपाट्याने बळींची व बाधितांची वाढती संख्या पाहता महिनाअखेरच्या सहा दिवसांत धक्कादायक संख्या गाठण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
सद्य:स्थितीत कोरोनाच्या मृत्यूंची संख्या ११२ वर पोहोचली आहे; तर बाधितांची संख्या ही ३९६४ पर्यंत पोहोचली असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र उदयास येत आहे.एप्रिल, मे, जून महिन्यांत कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यास प्रशासनाला यश आले होते. त्यामुळे जूनअखेरीस जिल्ह्यात कोरोनाचे अवघे ११ बळी गेले होते; तर बाधितांची संख्याही ८३९ पर्यंत आटोक्यात होती, त्यामध्ये शाहूवाडी तालुक्याचा पॉझिटिव्ह रुग्णांचा मोठा वाटा होता.दरम्यान, जुलै महिन्याच्या प्रारंभी कोल्हापूर, इचलकरंजी या दोन्ही शहरांसह करवीर तालुक्यातील बाधित रुग्णांची वाढलेली संख्या ही धक्कादायक आहे. जुलै महिन्याच्या अवघ्या २५ दिवसांत कोल्हापूर शहरात नवे ७९१ रुग्ण, इचलकरंजी शहरात नवे ६६२, तर करवीर तालुक्यात ४०४ नवे रुग्ण वाढले. या तीन ठिकाणी झालेली धक्कादायक वाढ ही आरोग्य प्रशासनाला विचारमंथन करण्यास भाग पाडणारी आहे. सध्या कोल्हापूर शहराची एकूण रुग्णसंख्या ७९१, इचलकरंजीची ७००, करवीर तालुक्याची रुग्णसंख्या ४२९ पर्यंत गाठली आहे.या तीन ठिकाणी वाढती रुग्णसंख्या असताना पहिल्या टप्प्यात वाढलेल्या शाहूवाडी व गडहिंग्लज तालुक्यांतील रुग्णवाढीचा वेग या महिन्यात मंदावला. शाहूवाडीत जूनअखेर १८६, तर गडहिंग्लज तालुक्यात १०४ रुग्णसंख्या होती. त्यामध्ये जुलैमध्ये अनुक्रमे १६० तर २०० नव्या रुग्णांची भर पडली. त्याशिवाय इतर तालुक्यातही रुग्णांची वाढ कमी आहे.एकंदर जिल्ह्यात कोल्हापूर व इचलकरंजीसह करवीर तालुका हा हॉटस्पॉट व संसर्गवाढीची ठिकाणे ठरली आहेत. या तीन ठिकाणी ज्या झपाट्याने रुग्णसंख्या वाढली, त्याच झपाट्याने या तीन ठिकाणांचा मृत्यूचा आकडाही वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११२ जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत, तर त्यामध्ये कोल्हापूर शहरात १८, इचलकरंजी शहरात ३७, तर करवीर तालुक्यात १२ जणांचा समावेश आहे.२४६८८ निगेटिव्हजुलै महिन्याच्या २५ दिवसांत तब्बल ३७ हजार ८०८ जणांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेण्यात आले. त्यांपैकी २४६८८ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला; पण त्यापाठोपाठ तब्बल नव्या ३१२५ रुग्णांची याच महिन्यात भर पडली. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या ही ३९६४ वर पोहोचली आहे. यापैकी १३८९ जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.४६ हजार जणांची तपासणीजिल्ह्यात सुमारे ४२ कोविड केअर सेंटरवर स्राव घेण्याची यंत्रणा कार्यरत आहे. त्यामध्ये लक्षणे नसलेल्या सुमारे ४६ हजार जणांची स्क्रीनिंग मशीनद्वारे प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. लक्षणे आढळलेल्यांचे स्राव घेण्यात आले आहेत.