कोल्हापूर : शहरात कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी २४ तासांत तब्बल ११० रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.शहरात रोज ८० पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. शनिवारी दिवसभरात सर्वाधिक ११० रुग्ण नव्याने आढळून आले. रोजच्या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयेही कमी पडत आहेत. या परिस्थितीमुळे प्रशासनही हतबल झाले आहे. लोकांनाही उपचारासाठी जायचे कुठे असा प्रश्न पडला आहे.रुग्णसंख्या सातशेच्या वरगेल्या आठ दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. शनिवारी ११० रुग्ण सापडल्यामुळे शहरात ७८७ रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत.नवीन सील केलेले प्रभागप्रभाग क्रमांक ७३ - साईसृष्टी अपार्टमेंट परिसर, जरगनगर, जवाहरनगर, चिंतामणी पार्क, भोसलेवाडी, शिवराज कॉलनी, शाहू कॉलनी, त्र्यंबोलीनगर, महाराणा प्रताप चौक, व्हीनस कॉर्नर परिसर, सोमवार पेठ, फुलेवाडी दुसरा स्टॉप परिसर.दिवसभरात सापडलेले रुग्णजरगनगर १, साईसृष्टी अपार्टमेंट परिसर १, चिले कॉलनी १, जवाहरनगर १, चिंतामणी पार्क ४, ताराबाई पार्क १, शिवाजी पार्क १, महालक्ष्मीनगर १, कपूर वसाहत १, जिव्हाळा कॉलनी ४, मंगळवार पेठ १, सोमवार पेठ १, महाराणा प्रताप चौक १, फुलेवाडी दुसरा स्टॉप १, महापालिका परिसर १, मोरे-माने नगर ४, उद्यमनगर २, रंकाळा २, शिवाजी पेठ १, राजारामपुरी आठवी गल्ली तीन, काटकर कॉलनी २, शाहूपुरी पाचवी गल्ली एक.समूह संसर्ग सुरू, नागरिकांनी दक्षता घेण्याची गरजएका कुटुंबात एकजण पॉझिटिव्ह सापडल्यास त्याचे संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित होत आहे. त्यामुळे शहरात समूह संसर्ग सुरू झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नागरिकांनी आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. त्र्यंबोलीनगर, शाहू कॉलनी या परिसरांत दहा रुग्ण सापडले. कावळा नाका विभागीय कार्यालय परिसरात तब्बल २२ रुग्ण सापडले आहेत.काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लक्षण असणाऱ्या रुग्णांची स्रावतपासणी केली जात नाही. परिणामी पॉझिटिव्ह आढळल्यास सर्वांना धोका पोहोचू शकतो. गोखले कॉलेज परिसरातील एका रुग्णालयामध्ये जिल्हा प्रशासनामध्ये कर्मचारी न्यूमोनियासाठी उपचार घेत होता. दाखल केल्यानंतर कोरोना तपासणी करणे आवश्यक होते. तसे केले नाही. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.
corona virus : शहरात कोरोनाचा कहर, दिवसभरात सर्वाधिक ११० रुग्ण सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:21 AM
कोल्हापूर शहरात कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी २४ तासांत तब्बल ११० रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
ठळक मुद्देकौटुंबिक संसर्गातून रुग्णात वाढ, एक सापडल्यास संपूर्ण कुटुंब बाधित दिवसभरात सर्वाधिक ११० रुग्ण सापडले