कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा जोर ओसरला असून, मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत २८७ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. मृत झालेल्या रुग्णांमध्ये चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. सात तालुक्यांत मंगळवारीही नव्या रुग्णांची संख्या दहाच्या आतच राहिली; त्यामुळे ग्रामीण भागातील साथ संपण्याच्या मार्गावर आहे.सीपीआर रुग्णालयाने रात्री दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता ४६ हजार ०१५ इतकी, तर मृतांची संख्या १५०५ झाली आहे. आतापर्यंत ३७ हजार २९३ एवढे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; तर स्वत:च्या घराबरोबरच विविध रुग्णालयांतून ७२२० रुग्ण उपचार घेत आहेत.सलग दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागातील कोरोनाचा जोर ओसरत असल्याचे दिसून आले. शाहूवाडी तीन, राधानगरी चार, पन्हाळा सहा, कागल चार, गडहिंग्लज सहा, चंदगड नऊ, आजरा तीन असे रुग्ण आढळून आले. भुदरगड तालुक्यात १६, तर हातकणंगले तालुक्यात ३९, करवीर तालुक्यात २६ रुग्ण आढळून आले. कोल्हापूर शहरात ७५ रुग्णांची नोंद झाली.शिरोळ तालुक्यातील दोघांचा मृत्यूमंगळवारी कोरोनाबाधित पाच रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील दानोळी, कानवाड, करवीर तालुक्यातील सांगवडे, हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली व बेळगाव जिल्ह्यातील अकोळ येथील रुग्ण उपचार सुरू असताना मृत झाले.१५३३ पैकी ११५४ निगेटिव्हसीपीआर रुग्णालयाच्या प्रशासनाला प्राप्त झालेल्या १५३३ चाचणी अहवालांपैकी ११५४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. ९०९ आरटीपीसीआर चाचण्यांपैकी १४० व्यक्तींचे तर ३०४ ॲन्टिजेन चाचण्यांपैकी ६२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी रुग्णालयातून झालेल्या चाचण्यांपैकी ८५ व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.तालुकानिहाय रुग्णसंख्याआजरा- ८०५, भुदरगड- ११५५, चंदगड- १०८४, गडहिंग्लज- १३११, गगनबावडा- १३१, हातकणंगले- ५०३३, कागल- १५७९, करवीर- ५३३७, पन्हाळा- १७६७, राधानगरी- ११९०, शाहूवाडी- १२२२, शिरोळ- २३६९, नगरपालिका हद्द- ७०८८, कोल्हापूर शहर- १३,९१७. एकूण रुग्ण - ४६,०१५. कोरोनामुक्त - ३७,२९३.
corona virus : कोरोनाचा जिल्ह्यातील जोर ओसरला, २८७ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 2:31 PM
corona virus, kolhapurnews, cityreport कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा जोर ओसरला असून, मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत २८७ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. मृत झालेल्या रुग्णांमध्ये चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.
ठळक मुद्देकोरोनाचा जिल्ह्यातील जोर ओसरला, २८७ रुग्णांची नोंदपाच रुग्णांचा मृत्यू : सात तालुक्यांत रुग्ण घटले