कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात आजमितीस कोविड-१९ रुग्णांसाठी ११४ व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून अतिरिक्त पीएम केअरची २० व्हेंटिलेटर्स कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय अतिरिक्त ३ व्हेंटिलेटर्स जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाली आहेत. ती लवकरच कार्यान्वित करण्यात येतील तसेच तांत्रिक कारणास्तव नादुरुस्त असलेली १८ व्हेंटिलेटर्स दुरूस्त करून कार्यान्वित केली जात असल्याची माहिती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली.सीपीआर. रुग्णालयात सुरुवातीस कोविड-१९ रुग्णांसाठी २३ (व्हेंटिलेटर्स/बायपॅप/एनआयव्ही ) व्हेंटिलेटर्स उपलब्ध होती. आता ५४ व्हेंटिलेटर्स व ६० नॉन इनवेझिव्ह व्हेंटिलेटर्स अशी मिळून ११४ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत तसेच जुने ९ व नवीन ९ अशी १८ व्हेंटिलेटर्स काही तांत्रिक कारणास्तव नादुरूस्त होती. ही व्हेंटिलेटर्ससुध्दा दुरुस्त करून कार्यान्वित केली जात आहेत.सीपीआरकडे ४३० खाटांना ऑक्सिजनची सुविधासीपीआर रुग्णालय १ ऑगस्ट, २०२० पासून संपूर्णपणे कोविड म्हणून घोषित करण्यात आले. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस या रुग्णालयात ३६० खाटा कोविड रुग्णांकरिता उपलब्ध होत्या, आता ४५० खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत तसेच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस ६४ आयसीयू खाटा उपलब्ध होत्या, त्या आता ९२ आयसीयूत खाटा कार्यान्वित आहेत. सुरुवातीस १०४ ऑक्सिजन खाटा उपलब्ध होत्या, आता ४३० खाटांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.रुग्णालयात हाय फ्लो नोझल २, नॉन इनव्हेझिव्ह व्हेंटिलेटर्स ६ आदी यंत्रसामग्रीसह रेमिडिसीविर, टोसीलोझुमॉब व फ्लॅविपिराविर यासारखी अतिमहत्वाची औषधे उपलब्ध आहेत. सी.पी.आर, रुग्णालयात कोविड रुग्णांचे डायलेसिस करण्यासाठी २ मशीन उपलब्ध असून त्याव्दारे आजपर्यंत ११२ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे डायलेसिसीस करण्यात आले.जवळपास ३३ कोविड रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यात आली असून या बाबतीत हे रुग्णालय महाराष्ट्रात अग्रेसर आहे. कोविड १९ च्या अनुषंगाने कोल्हापूर शहरातीत २६ तज्ञ डॉक्टरांच्या सेवा सी.पी.आर. रुग्णालयास उपलब्ध करण्याकरीता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ५ सप्टेंबरला आदेश दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा लवकरच उपलब्ध होणार आहेत. रुग्ण व्यवस्था सुरळीत असल्याचे डॉ. म्हस्के यांनी स्पष्ट केले.
corona virus : सीपीआरकडे कोविड रुग्णांसाठी ११४ व्हेंटिलेटर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 6:17 PM
तांत्रिक कारणास्तव नादुरुस्त असलेली १८ व्हेंटिलेटर्स दुरूस्त करून कार्यान्वित केली जात असल्याची माहिती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली
ठळक मुद्देसीपीआरकडे कोविड रुग्णांसाठी ११४ व्हेंटिलेटर्स४३० खाटांना ऑक्सिजनची सुविधा : अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के