कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रवेशद्वाराजवळील महापालिकेच्या पथकाकडून दिवसभरात ३३३ वाहनांमधील चार हजार ३०२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.कोरोनाचा संसर्ग कोल्हापूर शहरात होऊ नये म्हणून महानगरपलिका प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे. घर सर्वेक्षणाबरोबरच शहरातील शिरोली, शाहू, शिये या नाक्यांवर तसेच रेल्वेस्थानक व मध्यवर्ती बसस्थानक येथे खासगी बसने कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. संशयित प्रवाशाला रुग्णवाहिकेमधून सीपीआर रुग्णालय येथे पुढील तपासणीसाठी पाठविले जाते.तपासणी नाका वाहन संख्या प्रवासी संख्याशिरोली नाका ९६ १६७३शाहू नाका ७४ ३६५शिये नाका १२९ ३४९रेल्वेस्थानक ०६ १६४३मध्यवर्ती बसस्थानक २८ ३३५एकूण ३३३ ४३६२