कोल्हापूर : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील आयसोलेशन हॉस्पिटलसह १० कुटुंब कल्याण केंद्रांच्या ठिकाणी शहरातील नागरिकांचे मोफत स्राव घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.शहरातील लोकांची कोरोना टेस्ट घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. आतापर्यंत सीपीआर आणि आयसोलेशन हॉस्पिटल येथेच मोफत स्राव घेण्याची सुविधा उपलब्ध केली होती.
शहरवासीयांची मागणी आणि रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन महानगरपालिकेने आता सीपीआर आणि आयसोलेशनपाठोपाठ शहरातील १० कुटुंब कल्याण केंद्रांच्या ठिकाणी मोफत स्राव घेण्याचे नियोजन केले आहे. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आणि पंचगंगा हॉस्पिटल ही कुटुंब कल्याण केंद्रे केवळ गरोदर मातांसाठी राखून ठेवण्यात आली आहेत.कुटुंब कल्याण केंद्रफिरंगाई हॉस्पिटल, राजारामपुरी कुटुंब कल्याण केंद्र, कसबा बावडा कुटुंब कल्याण केंद्र, महाडिक माळ कुटुंब कल्याण केंद्र, फुलेवाडी कुटुंब कल्याण केंद्र, सदर बाजार कुटुंब कल्याण केंद्र, सिद्धार्थनगर कुटुंब कल्याण केंद्र, मोरे-माने नगर केंद्र