कोल्हापूर : शहरामध्ये कोरोनाचे शिवाजी पेठ आणि संभाजीनगर हे नव्याने हॉट स्पॉट घोषित करण्यात आले आहेत. शिवाजी पेठ येथे १५९, तर संभाजीनगर येथे ९९ रुग्ण झाले आहेत. मंगळवारी दिवसभरात १६० पेक्षा जास्त नवीन रुग्णांची भर पडली. तसेच दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील ८७ परिसर अद्यापि सील आहेत.शहरामध्ये मंगळवारी शिवाजी पेठेत सर्वाधिक २१ रुग्ण नव्याने आढळून आले. दीडशेपेक्षा जास्त रुग्ण झाल्यामुळे हा परिसर हॉट स्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याचबरोबर संभाजीनगरात रुईकर कॉलनी, कसबा बावडा, लक्षतीर्थ वसाहत आणि फुलेवाडी परिसरांत मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले आहेत.शहरातील आठजणांचा मृत्यूशहरासाठी मंगळवार हा कर्दनकाळ ठरला. आतापर्यंत सर्वाधिक एका दिवसात आठजणांचा मृत्यू झाला. यामध्ये संभाजीनगर येथील ८२ वर्षांचा पुरुष, कनाननगर येथील ५० वर्षांचा पुरुष, दौलतनगर येथील ६० वर्षांची महिला, जवाहर नगरीतील ७६ वर्षीय पुरुष, शिवाजी पेठेतील ८७ वर्षांचा पुरुष, मंगळवार पेठ येथे ६२ पुरुष, शाहूपुरी सहावी गल्ली येथे ७२ वर्षीचे पुरुष, शिवाजी पेठ, साकोली कॉर्नर येथे ६५ वर्षांची महिला यांचा समावेश आहे.दिवसभरात नव्याने आढळून आलेले रुग्णराजारामपुरी ११, कसबा बावडा १३, मंगळवार पेठ ८, शिवाजी पेठ २१, संभाजीनगर नऊ, लक्षतीर्थ वसाहत सात, फुलेवाडी नऊ, उत्तरेश्वर पेठ पाच, रुईकर कॉलनी १२, रमणमळा सात.हॉटस्पॉटमधील रुग्ण
- राजारामपुरी २८४,
- कसबा बावडा १७९,
- मंगळवार पेठ १६४,
- जवाहरनगर ८४,
- यादवनगर ७१,
- शिवाजी पेठ १५९,
- संभाजीनगर ९९.
चंद्रेश्वर प्रभागात सर्वांची तपासणीसंध्यामठ गल्ली, राजघाट रोड, चंद्रेश्वर गल्ली अशा परिसरात २० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महापालिकेचे पाच कर्मचारी आहेत. सहाजणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नगरसेविका शोभा बोंद्रे आणि इंद्रजित बोंद्रे युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. तत्काळ रुग्ण सापडून त्याच्यापासून इतरांना संपर्क होऊ नये यासाठी त्यांनी प्रभागातील सर्वांचीच तपासणी करणे सुरू केले आहे. यामध्ये प्रत्येकाची ऑक्सिजन आणि तापाची तपासणी केली जात आहे.