कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होत असताना आता कोरोना संसर्गाला रोखण्यासाठीचे नियम न पाळणाऱ्या प्रत्येकाला मोठ्या दंडाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असतानाच त्यावर उपययोजना म्हणून कडक कारवाईसाठी दंडात्मक पाऊल उचलले आहे. त्यासाठी रस्त्यावरुन फिरताना तोंडाला मास्क न वापरणे, कंटेन्टमेंट झोनमधील नियम मोडणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे यांच्यावर जागेवरच दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस, होमगार्ड व लोकप्रतिनिधींची पथके यासाठी निर्माण करण्यात येत आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाचे फोटो काढून घ्यावेत, तसेच त्यांना जागेवरच दंडाची आकारणी करावी अशा सक्त सुचना दिलेल्या आहेत. या शहरात अंमलबजावणीकोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव या शहरासाठी ही दंडात्मक कारवाईची नियमावली केली आहे. त्यामुळे याच परिसरात या कारवाई कडक करण्यात येणार आहेत.पथकांची रचनानियम मोडणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीनुसार अगर गावांनुसार ही विविध पथके तयार करण्यात येत आहेत. प्रत्येक तपासणी पथकामध्ये एक वाहतुक शाखेचा पोलीस, संबधीत पोलीस ठाण्यातील एक पोलीस, दोन होमगार्ड व त्या गावातील अगर भागातील सदस्य यांचा समावेश असेल.