कोल्हापूर : जिल्ह्यातून परदेश दौरा म्हटले की नागरिक अनेकदा दुबई, सौदी अरेबिया, अमेरिका आणि इंग्लंडला जात असल्याचे दिसून येते; परंतु गेल्या १५ दिवसांमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३२ देशांतून ३६२ नागरिक कोल्हापूरला आल्याचे स्पष्ट झाले आहे.पर्यटनासाठी गेलेल्या, नोकरीनिमित्त बाहेर असलेल्या अशा नागरिक, युवकांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये २१४ पुरुष तर १४८ महिला आहेत.परदेशातून आलेल्या नागरिकांमधून सर्वाधिक १३७ नागरिक हे दुबईतून परत आले असून, त्यामध्ये ५६ ग्रामीण, तर ८१ शहर भागातील आहेत. त्याखालोखाल सौदी अरेबियामधून ३६, तर अमेरिकेतून १७ जण परत आले आहेत. नेपाळमधून जे ५० जण आले आहेत, ते कोल्हापूर आणि परिसरातील असून ते पर्यटनासाठी गेले होते. विशेष म्हणजे ज्या चीनमधून कोरोना विषाणू पसरला तेथून सहाजण परत आले आहेत.या व्यतिरिक्त इटली, थायलंड, इराण, जर्मनी, कतार, मलेशिया, जपान, ओमान, जॉर्जिया, दक्षिण कोरिया, बांग्लादेश, अबुधाबी, माल्टा, लंडन, पाकिस्तान, स्पेन, वेस्ट इंडीज, आयर्लंड, फ्रान्स, इथोपिया, नॉर्वे, श्रीलंका, टांझानिया, कुवेत, आॅस्ट्रेलिया, केनिया येथूनही नागरिक कोल्हापुरात आले आहेत.
यामध्ये युवकांची संख्या मोठी असून ० ते ५ मध्ये १४, ६ ते १६ मध्ये १९ मुलांचा समावेश आहे. १७ ते ३५ वर्षे या वयोगटातील संख्या सर्वाधिक म्हणजे १४६ असून ३६ ते ४५ वयोगटातील ७१ तर ४६ वर्षांवरील ११२ जणांचा यामध्ये समावेश आहे.परदेशांतून आलेले तालुकावार नागरिक
- आजरा- ६
- भुदरगड- ११
- चंदगड- १३
- गडहिंग्लज- ७
- गगनबावडा- २
- हातकणंगले- ४७
- करवीर- ४७
- कागल- ३
- पन्हाळा- ११
- राधानगरी- ४
- शाहूवाडी- १
- शिरोळ- ४३
- इचलकरंजी नगरपालिका- २६
- कुरुंदवाड नगरपालिका- २६
- कोल्हापूर महापालिका- १३७