सुहास जाधव
पेठवडगाव : इस्लामपूर येथील करोना झालेल्या नातेवाईकांच्या संपर्कात आल्यामुळे येथील एका कुटुंबियांचे मिरज, इचलकरंजी येथे तपासणी साठी दाखल करण्यात आले.त्यांच्या मध्ये कोणतीही स्वीकृत दर्शनी लक्षणे दिसून आलेली नाहीत. मात्र अफवेमुळे शहर व परिसरात भिंतीचे वातावरण पसरले आहे. इस्लामपूर येथील कुटुंबाला करोनाची बाधा झाल्याचं सोमवारी उशिरा स्पष्ट झालं होतं. हे हजहून आले होते.येथे शिक्षणासाठी वडगाव येथील मुलगी राहत होती.तिच्यासह येथील नातेवाईक जेवणासाठी एकत्र आले होते.येताना मुलगीला सोबत आणले. लोकांच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेतला जात होता.दरम्यान प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुलीचे पालक व मुलगी, तिचा भाऊ यांनी सांगली येथील सिव्हिल हॉस्पीटल मध्ये काळजीपोटी दाखल झाले आहेत. तर अन्य ११ सदस्यांना इचलकरंजीच्या आय जी एम रूग्णालयात पालिका व भादोले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दाखल करण्यात आले आहे.
या सर्वांवर प्राथमिक लक्षणे दिसून येत नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. त्यांच्या वर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. मात्र तपासणी अहवाल आल्या नंतर नेमकेपणा समजणार आहे. पालिकेच्या संबंधित कुटूंबियांच्या घराचे व परिसराचे दोन- तीन वेळा औषध फवारणी करत निर्जंतुकीकरण केले आहे. दरम्यान या प्रकारामुळे शहरात घबराट पसरली आहे.
इस्लामपूर येथील नातेवाईकांच्या संपर्कात आल्यामुळे सुरक्षेसाठी संबंधित कुटूंबिय तपासणी दाखल करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या वर कोणतीही प्राथमिक लक्षणे सध्यातरी दिसून येत नाहीत.तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी.घरातून बाहेर पडू नये. - सुषमा कोल्हे शिंदे,मुख्याधिकारी, पेठवडगाव