कोल्हापूर : जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन, जिल्हा परिषद यांच्यातील योग्य समन्वयाअभावी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा घोळ दिसून आला, त्यामुळे अकडा वाढल्याचा दिसून आले, तर सोमवारी प्राप्त झालेल्या चाचणी अहवालाची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी जाहीर केली.
त्यानुसार जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ८३ असून दोन कोरोनागृस्तांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, हातकणंगले व गगणबावडा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव रोखण्यास प्रशासनाला अद्यापपर्यत यश आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना आरोग्ययंत्रणेवर कमालीचा ताण पडत आहे, जिल्हा प्रशासनासह, आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासनासह इतर विभाग अत्यंत चांगल्या पध्दतीने काम करत असले तरीही आरोग्ययंत्रणेत समन्वयाचा मोठा अभाव असल्याने कोरोनाग्रस्तांचा अकडा भलताच वाढल्याचे समोर आले होते.
पण मंगळवारी जाहीर सकाळी केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी दिवसभरात ३३ नवे कोरोनाबाधीत रुग्ण मिळाले तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत आकडेवाडीनुसार सर्वात जास्त शाहूवाडी तालुक्यात १८ बाधीत रुग्ण, त्या पाठोपाठ कोल्हापूर शहरात १३, भुदरगड व राधानगरी तालुक्यात प्रत्येकी ९, पन्हाळा ८, आजरा तालुका ६ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
आतापर्यत कोरोनाचे दोन बळी गेले आहेत. तर १३ जणांना डिसचार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण आकडेवारीत २१ ते ५० वयोगटातील तब्बल ५८ रुग्ण असल्याचे चित्र समोर आले आहे.