कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या धास्तीने कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सात वर्षांपेक्षा आतील शिक्षा झालेल्या अगर न्यायालयीन बंदी असलेल्या सुमारे १६० कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. गेले आठवडाभर ही प्रक्रिया संपूर्ण राज्यातील कारागृहांत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यास त्याची लागण कैद्यांना झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील. या पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्यात येणार आहे. त्यासाठी कारागृहातील सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेले कैदी व न्यायालयीन बंदी असणाऱ्या कैद्यांना किमान ४५ दिवस पॅरोलवर सोडण्यात यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
कैद्यांच्या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून त्याबाबतचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार कारागृह अधीक्षकांना देण्यात आले आहेत. कैद्यांना पॅरोलवर सोडण्यासाठी बंधपत्र तसेच १५ हजार रुपयांचे बंधपत्र घेण्यात आले. कळंबा कारागृहातील सुमारे २१५ कैद्यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे.कळंबा कारागृहातून गेल्या आठवड्याभरात सुमारे १६० कैद्यांची सुटका करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ५४ कैद्यांचा समावेश आहे. घरी सोडण्यात आलेले कैदी हे कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर येथील आहेत.कैदी सोडलेली तारीख व कैदी संख्या
- दि. ९ मे-१० कैदी
- दि. ११ -०५
- दि. १२ -२५
- दि. १३ -४२
- दि. १४ -५७
- दि. १५ -२१
- दि. १६ -०५ कैदी.