कोल्हापूर - आजअखेर एकूण १९ रेल्वेमधून २५ हजार ५२१ मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे रवाना झाले आहेत.आज दुपारी १ वा जिल्ह्यातील १२२४ मजुरांना घेवून बिहारमधील आरारियाकडे रेल्वे रवाना झाले. लोकमतचे संपादक वसंत भोसले, आयएसटीई नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवला. सायंकाळी ५ वाजता जिल्ह्यातील १५०९ मजुरांना घेवून बिहारमधील बरोनीकडे रेल्वे रवाना झाली.
खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्यध्यक्ष भरत रसाळे आणि एस.एच.पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी डॉ. महादेव नरके, डी.डी.पाटील, प्रा. राजेंद्र रायकर, हेमंत उलपे, पार्थ मुंडे, दिपक थोरात, शामराव कदम आदी उपस्थित होते.आजअखेर जिल्ह्यातील एकूण २५ हजार ५२१ रवाना झालेल्या मजुरांपैकी सर्वाधिक १३ हजार ५५२ उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत. बिहारकडे ८ हजार ४२१, मध्यप्रदेशकडे १०६६, झारखंडकडे १४६० आणि राजस्थानकडे १४७७ मजूर परतले आहेत.