सिंधुदुर्ग : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तरीही कोरोनाला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून नजीकच्या काळात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाबाबतचे सूक्ष्म व योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीव्दारे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण मोहीम व कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आदी उपस्थित होते.पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, येत्या काळात शासन टप्प्याटप्प्याने कोरोनाची लस देणार आहे. या लसीचे डोस शासनाच्या सूचनेप्रमाणे प्राधान्याने आरोग्यासंबंधित यंत्रणेत काम करणाऱ्या सर्वांना देण्यात येणार आहेत. कोरोना लसीकरण हा ज्चलंत विषय असून आरोग्य व संबंधित यंत्रणांनी याकडे काळजीपूर्वक, भान ठेवून व पारदर्शकपणे काम करावे. त्यासाठीचे नियोजनही अगदी अचूक असावे.जिल्ह्यामध्ये अंदाजे ४ लाख लसींची साठवणूक करण्याची क्षमता आरोग्य यंत्रणेकडे आहे. जिल्ह्यामध्ये ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी लसीकरणासाठीची यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आतापासून कामाला लागावे. कोरोना लसीची साठवणूक करण्याबरोबरच या लसीच्या वाहतूकीचेही नियोजन करण्यात यावे. लस टोचण्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी उपलब्धतेबाबत नियोजन असावे. जिल्ह्यात कोरोनाची सुरुवात झाल्यापासून कोविड रुग्ण व नॉन कोविड रुग्ण याचीही माहिती तयार करावी. जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या घराबाबत व इतर समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशा सूचना दिल्या.हलगर्जीपणा करू नयेपालकमंत्री उदय सामंत म्हणाले, कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु करण्यात येईल. परंतु अजून कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे जनतेने तोंडावर मास्क घालावा. सामाजिक अंतराचे पालन करावे. हात स्वच्छ धुण्यामध्ये हालगर्जीपणा करू नये, असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
corona virus : कोरोना लसीकरणाचे सूक्ष्म, योग्य नियोजन करावे : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 12:31 PM
CoronaVirusUnlock, Goverment, UdaySamant, Collcatoroffice, Sindhudurngnews कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तरीही कोरोनाला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून नजीकच्या काळात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाबाबतचे सूक्ष्म व योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
ठळक मुद्देकोरोना लसीकरणाचे सूक्ष्म, योग्य नियोजन करावे : उदय सामंत शासनाकडून नजीकच्या काळात लसीकरण