कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा व राज्यातील इतर २० लॅबनी दिनांक २५ एप्रिल ते १२ मे २०२१ या कालावधीत कोविड-१९ RT PRCR चे १८७७ आणि RAT चे ३२२ कोविड रुग्णांच्या नोंदणी अहवालाच्या संदर्भात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी नोटीसा बजाविल्या आहेत.यामध्ये RAT ( रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट ) - अंतर्गत अनुष्का डायग्नोस्टिक सेंटर (शिरोळ) ,केअर मल्टिस्पेशालिटी (हातकणंगले), निदान पॅथालॉजी (इचलकरंजी) ,जयसिंगपूरच्या अनुक्रमे पायोस हॉस्पिटल , श्री साई लॅब, कोल्हापूरचे शिवतेज लॅब , पार्थ लॅब , देसाई पॅथालॉजी, सृष्टी क्लिनिकल लॅबोरेटरी , मृण्मयी लॅब, हेल्थ व्हयू या ११ लॅबनी तर RT - PRCR अंतर्गंत कृष्णा डायग्नोस्टिक (पुणे) , डॉ . लाल पॅथालॉजी (विमान नगर - पुणे) , मेट्रो पोलीस हेल्थ केअर (मुंबई) , प्रिव्हेंन्टीन लाईफ केअर (नवी मुंबई) , थायरो केअर टेक्नॉलॉजी प्रा .लि. (नवी मुंबई) , इन्फेक्शन लॅबोरेटरीज (ठाणे) ,युडीसी सॅटेलाईट लॅबोरेटरी (नवी मुंबई), सब अर्बन डायग्नोस्टिक पुणे आणि सदाशिव पेठ (पुणे) येथील अपोलो हेल्थ लाईफ स्टाईल या ९ लॅबचा समावेश आहे.
या लॅबनी त्यांच्याकडील कोविड रूग्णांच्या चाचण्यांचा अहवाल (IDSP) एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्षास वेळेत आणि विहीत नमुन्यात सादर न केल्याने जिल्ह्याच्या कोविड निर्देशांकामध्ये तफावत आल्यामुळे या नोटीसा देण्यात आल्या आहेत. आपत्ती कायदयातंर्गत व साथरोग कायदयान्वये या दोषी लॅबवर पुढील कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.