कोल्हापूर : सलग काही दिवस कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढत असून, नव्या रुग्णांचीही संख्या कमी येत असल्याने आता केवळ ७ हजार ७५ कोरोना रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. मात्र, गेल्या २४ तासांत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.रात्री उशिरापर्यंत इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार १८२ इतकी नोंदली गेली आहे. त्यातील तब्बल ३७ हजार ५९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, केवळ ७०७२ जण उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासांत १२ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये अन्य जिल्ह्यांतील तिघांचा समावेश आहे.दिवसभरामध्ये ६६० जणांची तपासणी करण्यात आली असून ६६६ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ३०२ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ३०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १५१४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.गेल्या २४ तासांत झालेले मृत्यू
- ८० वर्षीय पुरुष खुपिरे, ८५ वर्षीय महिला पाडळी खुर्द, ता. करवीर
- ६० वर्षीय महिला सुभाषनगर, ६४ वर्षीय पुरुष सासने जमादार कालनी, कोल्हापूर
- ७० वर्षीय पुरुष बारवे, ता. भुदरगड
- ४२ वर्षीय पुरुष निलेवाडी, ७६ वर्षीय पुरुष नवे पारगाव, ता. हातकणंगले
- ६९ वर्षीय पुरुष कुरुंदवाड, २८ वर्षीय पुरुष कुरुंदवाड, ता. शिरोळ
- ६२ वर्षीय पुरुष कसाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
- ५५ वर्षीय पुरुष येडानबावडी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव
- ६७ वर्षीय पुरुष बिरानवाडी, ता. तासगाव, जि. सांगली
तालुकावार आकडेवारी ( मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर ते बुधवार, दि. ७ ऑक्टोबर सायं. ५ पर्यंत)अ.नं. तालुका एकूण पॉझिटिव्ह
- आजरा ८१०
- भुदरगड ११५९
- चंदगड १०९४
- गडहिंग्लज १३१६
- गगनबावडा १३१
- हातकणंगले ५०४६
- कागल १५८८
- करवीर ५३५१
- पन्हाळा १७७६
- राधानगरी ११९२
- शाहूवाडी १२२६
- शिरोळ २३७६
- नगरपालिकाइचलकरंजी,जयसिंगपूर,कुरुंदवाड ७१११
- कोल्हापूर शहर १३९६७
- इतर जिल्हा, राज्य २०३९
रात्री उशिराचा आकडा ४६१८२