कोल्हापूर : जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा बुधवारी दोन हजाराच्या खाली आला आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गेल्या २४ तासांत ९१ नवे रुग्ण सापडले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १६१४ इतकी झाली आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील ४७५६९ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ४३९८२ जण कोरोनातून बरे झाले आहेत. १६१४ जणांचा मृत्यू झाला आहे तर १९७३ जण सध्या उपचार घेत आहेत. दिवसभरामध्ये ७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आधीच्या तुलनेत जिल्ह्यातील चाचण्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ५४२ जणांची तपासणी करण्यात आली असून ५७४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत तर १४१ जणांची ॲन्टीजेन टेस्ट तपासणी करण्यात आली आहे.सीपीआरमधील ५ जणांचा मृत्यूगेल्या २४ तासांत एकूण ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सीपीआरमधील ५ जणांचा समावेश आहे. ४९ वर्षीय पुरुष नंदाळपूर (ता. कऱ्हाड), ७५ वर्षीय महिला कसबा बावडा, ७९ वर्षीय पुरुष लिंगनूर (ता. कागल), ६५ वर्षीय पुरुष वाशी (ता. करवीर), ५० वर्षीय पुरुष धामोड (ता. राधानगरी), ७८ वर्षीय पुरुष शिरटी (ता. शिरोळ), ६७ वर्षीय पुरुष चेंबूर (मुंबई) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.तालुकावार आकडेवारी( मंगळवार दि. २० आॅक्टोबर ते बुधवार दि. २१ ऑक्टोबर सायं. ५ पर्यंत)अ.नं. तालुका एकूण पॉझिटिव्ह
- १ आजरा ८३६
- २ भुदरगड ११८८
- ३ चंदगड ११४८
- ४ गडहिंग्लज १३७०
- ५ गगनबावडा १३९
- ६ हातकणंगले ५१६२
- ७ कागल १६१९
- ८ करवीर ५४८७
- ९ पन्हाळा १८२२
- १० राधानगरी १२०७
- ११ शाहूवाडी १२७२
- १२ शिरोळ २४२८
- १३ नगरपालिका -इचलकरंजी, जयसिंगपूर,कुरुंदवाड ७२९०
- १४ कोल्हापूर शहर १४४२०
- १५ इतर जिल्हा, राज्य २१८१
- एकूण ४७५६९ एकूण मृत्यु १६१४