कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यू हा पर्याय नाही. असे करत राहिलो तर लोकांचं पोट कसं चालणार, उत्पन्न कसे मिळणार याचा विचार केला पाहिजे.
कोल्हापुरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या चिंताजनक आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार संभाजीराजे यांनी काही सूचनाही केल्या.
कर्फ्यूऐवजी शासन आणि लोकप्रतिनिधींनी जनजागृती करून लोकांवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटरपर्यंत जाण्याची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, कर्फ्यू करून किती दिवस व्यवहार बंद ठेवणार, हा काही दीर्घकालीन पर्याय नाही. सध्या भारताचा उणेमध्ये गेला आहे. तो कसा वाढणार. त्यामुळे व्यवहार चालूच राहिले पाहिजेत. दुसरीकडे लोकांमध्ये जागरुकता वाढवली पाहिजे.