शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

corona virus : कोरोनापासून दिलासा, जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 3:53 PM

कोरोना संसर्गाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्याला सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. गेल्या २४ तासांत ४६१ नवीन रुग्णांची नोंद झाली; तर विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे४६१ नवीन रुग्ण, तर २१ जणांचा मृत्यू आरोग्य यंत्रणेवरील ताणही होतोय कमी

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्याला सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. गेल्या २४ तासांत ४६१ नवीन रुग्णांची नोंद झाली; तर विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या २१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

जुलै, ऑगस्ट महिन्यांत समूह संसर्गाचा उद्रेक झाला होता, तो आता आटोक्यात येत असल्याचे आशादायक चित्र पाहायला मिळत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रोज हजाराच्या पटीत नवीन रुग्ण आढळून येत होते; तर ३० च्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत होता. त्या मानाने सोमवारी काहीसा दिलासा मिळाला. कोरोनाची साथ नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळत आहे.

समूह संसर्गही आटोक्यात येत आहे. गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या नवीन ४६१ रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या ४० हजार २४२ झाली, तर २१ जणांच्या मृत्यूमुळे मृत होणाऱ्यांची संख्या १२७८ झाली आहे.कोरोना संसर्गाच्या वाढत्या काळात आणखी एक दिलासा देणारी घटना अशी की, जिल्ह्यात सध्या १० हजार ३८२ कोरोनाबाधित रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यातील तब्बल ६५३४ रुग्ण हे सौम्य लक्षणे असल्यामुळे घरच्या घरीच उपचार घेत आहेत; तर प्रत्यक्षात ३८४८ रुग्ण हे विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना जसा दिलासा मिळत आहे, तसाच तो आरोग्य यंत्रणेलाही मिळत आहे.शिरोळ व गडहिंग्जलमध्ये प्रत्येकी चार मृत्यूजिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे मरण पावलेल्यामध्ये १५ पुरुषांचा, तर सहा महिलांचा समावेश आहे. शिरोळ व गडहिंग्लजचे प्रत्येकी चार रुग्ण उपचारांदरम्यान मृत्यू पावले. शिरोळमधील यड्राव, नांदणी, धरणगुत्ती, अब्दुललाट; तर गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज शहर, नूल, मांगनूर, जाकेवाडी येथील रुग्ण मृत झाले.

कोल्हापूर शहरातील जाधववाडी, शिवाजी पेठ, न्यू शाहूपुरी; करवीरमधील शिंगणापूर, उचगाव, पन्हाळा तालुक्यातील पोर्ले, मानेवाडी, शाहूवाडीतील डोणोली, आजऱ्यातील हारूर, इचलकरंजी शहर, शहापूर, चंदगडातील भोंजवाडी येथील रुग्ण मृत झाले आहेत.१७९९ चाचणी अहवाल प्राप्तगेल्या २४ तासांत १७९९ चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यांतील ११४२ आरटीपीसीआर चाचण्यांपैकी ९२४ अहवाल निगेटिव्ह आले; तर २१७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ४५२ ॲन्टिजेन चाचण्यांपैकी ४१४ जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी प्रयोगशाळांतील २०६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.सगळीकडेच आशादायक चित्रजिल्ह्यात सगळीकडेच आशादायक चित्र आहे. कोल्हापूर व इचलकरंजी या दोन हॉटस्पॉट बनलेल्या शहरांतील रुग्णसंख्या घटत आहे. कोल्हापूर शहरात सोमवारी केवळ १३० रुग्ण आढळून आले; तर इचलकरंजी शहरात १२ रुग्ण आढळून आले.

करवीर व हातकणंगले तालुक्यांनीही संसर्गाच्या बाबतीत आघाडी घेतली होती. तेथेही रुग्णसंख्या घटली आहे. हातकणंगलेत ५०, तर करवीरमध्ये ५४ रुग्ण नव्याने आढळून आले. शाहूवाडी ३७, पन्हाळा २५, गडहिंग्लज २०, भुदरगड येथे १७ रुग्ण आढळून आले. आजरा, राधानगरी, कागल या तीन तालुक्यांत तर हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच रुग्ण आढळून आले.तालुकानिहाय रुग्णसंख्या -आजरा - ७१७, भुदरगड - ९५२, चंदगड - ८६१, गडहिंग्लज - १०१७, गगनबावडा - ११९, हातकणंगले - ४४९८, कागल - १४०५, करवीर - ४५८३, पन्हाळा - १५३०, राधानगरी - १०८३, शाहूवाडी - १०५७, शिरोळ - २१४५, कोल्हापूर शहर - १२ हजार ४५५, नगरपालिका हद्द- ६२५९, इतर जिल्हा- १५८१.

  • आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या - ४० हजार २६२
  •  आतापर्यंत बरे झालेली रुग्णसंख्या - २८ हजार ६०२
  • मृत झालेल्या रुग्णांची संख्या - १२७८
  • उपचार घेत असलेले रुग्ण - १० हजार ३६२.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर