शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

corona virus : शाहूवाडी, आजरा, कागलसह सात तालुके कोरोनामुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 1:52 PM

Corona virus, rurualarea corona free, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, कागल, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या सात तालुक्यांतून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. रुग्णवाढीचा आलेख खाली सरकताना दिसत असून, कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही समाधानकारकपणे वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९६ नवीन रुग्णांची नोंद झाली; तर १३ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देशाहूवाडी, आजरा, कागलसह सात तालुके कोरोनामुक्तीकडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील आजरा, चंदगड, कागल, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या सात तालुक्यांतून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. रुग्णवाढीचा आलेख खाली सरकताना दिसत असून, कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही समाधानकारकपणे वाढत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९६ नवीन रुग्णांची नोंद झाली; तर १३ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.कोल्हापूर शहर, करवीर आणि हातकणंगले या दोन तालुक्यांतच कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. मात्र तेथील रुग्णवाढीचे प्रमाणही नियंत्रणात आहे. शनिवारी कोल्हापूर शहरात ८०, करवीर तालुक्यात ४७, हातकणंगले तालुक्यात तर भुदरगड तालुक्यात १० नवीन रुग्णांची नोंद झाली.

शनिवारी नोंद झालेल्या नवीन २९६ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता ४५ हजार ३५५ झाली आहे, तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या १४७९ वर गेली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने चिंतेची बाब बनलेला रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही आता खाली आले आहे.

रोज ३० ते ३५ रुग्ण दगावले जात होते. तेही प्रमाण आता १२ ते १५ पर्यंत खाली आले आहे. त्यामुळे मृत्यूच्या बाबतीतही दिलासादायक चित्र आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की, शनिवारी ३६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले.मृतांत १० पुरुष, तर तीन महिलाकोल्हापुरात गेल्या चोवीस तासात उपचार घेणारे १३ रुग्ण कोरोनामुळे मयत झाले. त्यामध्ये १० पुरुष तर तीन महिला रुग्ण आहेत. शिरोळ तालुक्यातील शिरोळ शहर, धरणगुत्ती, मजरेवाडी, हातकणंगले तालुक्यातील अंबप व गंगापूर, इचलकरंजी शहरातील विक्रमनगर, गडहिंग्लज शहर व मुंगुरवाडी, कोल्हापूर शहरातील जुना बुधवार पेठ येथील रुग्णांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर बेळगाव, सांगली व सावंतवाडी येथील रुग्णांचा कोल्हापुरात मृत्यू झाला.उपचारांतील गोंधळ संपलानवीन रुग्णांची संख्या घटत असल्याने तसेच कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये, कोविड केअर सेंटर्स, ग्रामीण रुग्णालयांतील खाटा हळूहळू रिकाम्या होऊ लागल्या आहेत. रुग्णालयांत दाखल असलेल्या सर्वच रुग्णांवर नीट उपचार होत असून जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये निर्माण झालेला गोंधळही आता संपला आहे. आरोग्य यंत्रणेवरील भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.तपासण्यांची संख्या रोडावलीनवीन रुग्णांची संख्या कमी होईल तशी संशयित व्यक्तींच्या तपासण्याही कमी होत आहेत. मागच्या २४ तासांत ९६८ आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल सीपीआर रुग्णालयाकडे प्राप्त झाले. त्यांपैकी ७८१ जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर १८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. २८५ ॲन्टिजेन चाचण्यांपैकी २६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, तर २५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी लॅब व रुग्णालयात ३०७ व्यक्तींच्या चाचण्या झाल्या. त्यांपैकी ९० व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.आतापर्यंतची तालुकानिहाय रुग्णसंख्या अशी -

  • आजरा - ७९८,
  • भुदरगड - ११२५,
  • चंदगड -१०५३,
  • गडहिंग्लज - १२९१,
  • गगनबावडा - १३०,
  • हातकणंगले - ४९७१,
  • कागल - १५५६,
  • करवीर - ५२५७,
  • पन्हाळा - १७५१,
  • राधानगरी - ११७९,
  • शाहूवाडी - १२१५,
  • शिरोळ - २३५१
  • नगरपालिका हद्द - ६९७१,
  • कोल्हापूर शहर - १३७३२
  • इतर जिल्हा - १९७५.
  • एकूण रुग्णसंख्या - ४५ हजार ३५५
  • कोरोनामुक्त रुग्णसंख्या - ३५ हजार २२६
  • आतापर्यंत मृत रुग्ण - १४७९
  •  उपचार घेत असलेले रुग्ण - ८६५०
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर