कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झपाट्याने कमी होत चालला असून मंगळवारी १६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर नवीन ६१ रुग्णांची नोंद झाली. नवीन रुग्णांचे प्रमाण ६.८४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. आता केवळ १००४ बाधित रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.गेल्या काही दिवसांपासून ५० ते १०० पर्यंत नवीन रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रमाणदेखील बरेच घटले आहे. मंगळवारी नव्याने नोंद झालेल्या ६१ रुग्णांमुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४७ हजार ८९३ पर्यंत गेली आहे, तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४५ हजार २५३ वर गेली आहे. विविध रुग्णालयांत तसेच घरात उपचार घेणाऱ्यांची संख्या आता केवळ १००४ इतकीच राहिली आहे.गगनबावडा, कागल, राधानगरी, शिरोळ या चार तालुक्यांत मंगळवारी एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही. आजरा तालुक्यात दोन, भुदरगड, गडहिंग्लज तालुक्यात प्रत्येकी पाच, हातकणंगले तालुक्यात चार, पन्हाळा एक, शाहूवाडी तालुक्यात दहा रुग्णांची नोंद झाली. कोल्हापूर शहरात १७ नवीन रुग्ण आढळून आले.तीन पुरुष रुग्णांचा मृत्यू मंगळवारी तीन पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये करवीर तालुक्यातील उचगांव, हातकणंगले तालुक्यातील घुणकी तर कोल्हापूर शहरातील कावळा नाका येथील व्यक्तींचा त्यामध्ये समावेश आहे. दोघांचे मृत्यू सीपीआर मध्ये तर एकाचा मृत्यू आयजीएममध्ये झाला. मृत्यूचे प्रमाण रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.मास्क हिच लस कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने नागरिकांमध्ये त्याच्याविषयीची भीतीही कमी झाली आहे. त्यामुळे कसेही वागून चालणार नाही. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मास्क हिच लस मानून नाकाला मास्क लावला पाहिजे. दुसऱ्यांदा साथ येण्याची शक्यता असल्याने अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे.तालुकानिहाय रुग्णसंख्या -आजरा - ८४०, भुदरगड - १२०१, चंदगड - ११६०, गडहिंग्लज - १३८६, गगनबावडा - १४०, हातकणंगले - ५१९९, कागल - १६२५, करवीर - ५५१४, पन्हाळा - १८३०, राधानगरी - १२११, शाहूवाडी - १३०३, शिरोळ - २४४२, नगरपालिका हद्द - ७३०९, कोल्हापूर शहर - १४,५२९, इतर जिल्हा - २२०४.
corona virus : जिल्ह्यात आता फक्त १००४ कोरोनाबाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 11:20 AM
CoronaVirus, cprhospital, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झपाट्याने कमी होत चालला असून मंगळवारी १६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर नवीन ६१ रुग्णांची नोंद झाली. नवीन रुग्णांचे प्रमाण ६.८४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. आता केवळ १००४ बाधित रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
ठळक मुद्देजिल्ह्यात आता फक्त १००४ कोरोनाबाधित रूग्णजोर पूर्ण ओसरला : ६१ नवीन रुग्णांची नोंद : तिघांचा मृत्यू