कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती वेगाने बदलत असून शुक्रवारी नवीन १३२ इतक्या नीचांकी रुग्णांची नोंद झाली; तर दहा रुग्णांचा मृत्यू झाला. तीन तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही; तर तीन तालुक्यांत प्रत्येकी आठ, दोन तालुक्यांत प्रत्येकी सहा, तीन तालुक्यांत प्रत्येकी चार, तर आजरा तालुक्यात केवळ एकच नवीन रुग्ण आढळून आला.कोल्हापुरातून कोरोना संसर्ग जवळपास आता हद्दपार होण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यात शुक्रवारी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा अशा तीन तालुक्यांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही. कागल, शाहूवाडी, शिरोळ तालुक्यांत प्रत्येकी चार, चंदगड, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांत प्रत्येकी आठ, भुदरगड व करवीर तालुक्यांत प्रत्येकी सहा नवीन रुग्णांची नोंद झाली. आजरा तालुक्यात तर एकाच रुग्णाची नोंद झाली.१० पैकी चार मृत बाहेरच्या जिल्ह्यातीलगेल्या २४ तासांत जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू झाला. त्यांतील चार रुग्ण मुंबई, सातारा, सांगली, बेळगाव येथील आहेत; तर करवीर तालुक्यातील नागदेववाडी, पेटकरवाडी, शाहूवाडीतील उखळू, शिरोळमधील धरणगुत्ती, भुदरगडमधील सोनाळी येथील रुग्णांचा मृतांत समावेश आहे. मृतांमध्ये तीन महिला आहेत.लवकरच कोरोनामुक्त जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटण्याचे प्रमाण असेच राहिले आणि बरे होण्याचे प्रमाण वाढले तर घटस्थापनेच्या आधीच कोल्हापूर कोरोनामुक्त जिल्हा म्हणून जाहीर होईल.चाचण्यांचा तपशील असा-चाचण्यांचा प्रकार एकूण चाचण्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह१. आरटीपीसीआर - १५६५ १५३३ ३१२. ॲन्टिजेन - १९८ १७५ २३३. खासगी लॅब ३४५ २६७ ७८तालुकानिहाय रुग्णसंख्या -आजरा -८१२, भुदरगड - ११६८, चंदगड - १११०, गडहिंग्लज - १३२८, गगनबावडा - १३१, हातकणंगले - ५०६९, कागल - १५९५, करवीर - ५३७४, पन्हाळा - १७८१, राधानगरी - ११९३, शाहूवाडी - १२४२, शिरोळ - २३८९, नगरपालिका हद्द - ७१६५, कोल्हापूर शहर - १४०८३, इतर जिल्हा - २०६९.
- एकूण रुग्णसंख्या - ४६ हजार ५०९
- कोरोनामुक्त रुग्णसंख्या - ३८ हजार ८१२
- एकूण मृत रुग्णांची संख्या - १५३५
- रुग्णालयांत उपचार घेणारे रुग्ण - ६१६२