कोल्हापूर : रोज शहरात २० पेक्षा जास्त रुग्ण सापडत असल्यामुळे शहर हॉट स्पॉटच्या दिशेने वेगाने जात आहे. निम्म्यापेक्षा जास्त परिसर सील झाला आहे. रविवारी दिवसभरात २५ पेक्षा जास्त रुग्णांची नव्याने भर पडली; यामुळे आतापर्यंत शहरातील रुग्णांचा आकडा २५० वर पोहोचला आहे.सानेगुरुजी परिसर सीलसाने गुरुजी वसाहतीच्या परिसरातील नागेश मंगल कार्यालय समोर ६० वयाच्या एकास कोरोना झाला. संबंधित व्यक्ती पुण्याहून आलेल्या नातेवाइकाच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना कोरोना झाल्याचे समजते. महापालिकेने तिथे फवारणी केली असून परिसर सील केला आहेअंबाई टँक परिसरात एक रुग्णरंकाळा पार्क येथील अंबाई टँक परिसरातील एका महिलेला कोरोना झाला. संबंधित महिला आंबेजोगाई येथून कोल्हापुरात आली होती. हॉटेलमध्ये त्या अलगीकरण कक्षात होत्या; त्यामुळे परिसर सील करण्याची गरज लागली नाही.वाढदिवसाला गेलेल्यांचे धाबे दणाणलेमार्केट यार्ड येथे भाजी विक्रेत्यास कोरोना झाला आहे. ते रुईकर कॉलनीत राहत आहेत. १५ जुलै रोजी त्यांच्या वाढदिवसाला दोनशेपेक्षा जास्त नागरिक आले होते. त्यांचे धाबे दणाणले आहे. त्यांनी स्वतःहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.रुग्ण सापडल्यामुळे सील झालेले परिसर
- शिवाजी पार्क - एक
- अंबाई टँक परिसर - एक
- सम्राटनगर - दोन
- जवाहरनगर - एक
- सरनाईक वसाहत - एक
- टिंबर मार्केट - एक
- कदमवाडी - दोन
- विक्रमनगर - एक
- उभा मारुती चौक, शिवाजी पेठ - एक
- खानविलकर पेट्रोल पंप परिसर - एक
- उद्यमनगर - एक
- कसबा बावडा - एक
- कसबा बावडा - आंबे गल्ली एक
- खानविलकर पेट्रोल पंप - एक
- ताराबाई पार्क - एक
- साने गुरुजी वसाहत - एक
- राजाराम चौक - एक
- अन्य ठिकाणी - सहा