कोल्हापूर : पुणे, मुंबई अशा कोरोनाची लागण झालेल्या शहरातून आलेल्या प्रवाशांच्या तपासणीसाठी महानगरपालिकेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक येथे आरोग्य पथकांची नियुक्ती गुरुवारी करण्यात आली.विविध ठिकाणच्या प्रवाशांच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे; त्यामुळे खबरदारी म्हणून महानगरपालिकेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकावर या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.मध्यवर्ती बसस्थानकांत आलेल्या प्रवाशांना कोरोनाबाबत काही शंका असेल, त्यांना या पथकांद्वारे मार्गदर्शन केले जाते. तसेच गेली आठ - दहा दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला ज्यांना आहे, अशा प्रवाशांची प्राथमिक तपासणी करून गरज वाटल्यास त्यांना सीपीआरमध्ये पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे.
सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे पथक या ठिकाणी तैनात ठेवण्यात आले आहे. पथकामध्ये दोन डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत याबाबत खबरदारी घेण्याची पत्रके वाटण्यात येत आहेत.