कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाची साथ आता पूर्णपणे आटोक्यात आली असून विविध रुग्णालयात तसेच घरातून केवळ ७१५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या चोवीस तासांत ६७ रुग्णांची नोंद झाली तर ७८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. कागल तालुक्यातील चिखली येथील एका ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात १०, कागल तालुक्यात सहा, करवीर तालुक्यात सात, शाहूवाडी तालुक्यात चार तर चंदगड तालुक्यात पाच नवीन रुग्णांची नोंद झाली. कोल्हापूर शहरात २३ रुग्णांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे भुदरगड, गगनबावडा, राधानगरी तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४८ हजार ५५१ वर गेली असून ४६ हजार १७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १६५७ रुग्णांचा मृत्यू झाला.
corona virus : कोरोनाच्या ७१५ रुग्णांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:54 PM
Coronavirus, hospital, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची साथ आता पूर्णपणे आटोक्यात आली असून विविध रुग्णालयात तसेच घरातून केवळ ७१५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या चोवीस तासांत ६७ रुग्णांची नोंद झाली तर ७८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. कागल तालुक्यातील चिखली येथील एका ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
ठळक मुद्देकोरोनाच्या ७१५ रुग्णांवर उपचार सुरू १२ दिवसांत १०० पेक्षा जास्त जणांनी घेतला उपचार