गेल्यावर्षी मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून शाळा बंद झाल्या. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग ऑनलाईनच सुरू राहिले. सलग दुसऱ्यावर्षी ऑनलाईन वर्ग भरविण्यात आले. सध्या उन्हाळी सुटी सुरू झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने लसीकरण राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ३४,४३,८१७ नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे. त्यापैकी दि. १२ मे पर्यंत ८,८१,४२६ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला असून त्यांचे प्रमाण २६ टक्के, तर १,९३,७०७ जणांनी दुसरा डोस घेतला असून त्यांचे प्रमाण ६ टक्के आहे. डोसच्या उपलब्धतेवर लसीकरणाचा वेग अवलंबून आहे. त्यामुळे लसीकरणाची सध्यस्थिती पाहता जूनमधील शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ लांबण्याची शक्यता आहे.
चौकट
५५ हजार विद्यार्थी थेट दुसरीत
कोरोनामुळे गेल्या वर्षी इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग प्रत्यक्षात भरले नाहीत. त्यामुळे वर्ग, शिक्षकांना प्रत्यक्षात न पाहताच जिल्ह्यातील इयत्ता पहिलीचे ५५३०१ विद्यार्थी हे थेट दुसरीच्या वर्गात प्रवेशित झाले आहेत.
शिक्षणाधिकारी म्हणतात?
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासह लसीकरण ज्या पद्धतीने होईल. त्यानंतरच शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित जूनपासूनच्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ पुढे जाण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी यावर्षी दहावी, बारावीमध्ये प्रवेशित झाले आहेत. त्यांचे जादा तास ऑनलाईन स्वरूपात सुरू करण्याबाबतचा विचार सुरू असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.
विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक!
कोरोनामुळे गेल्या वर्षीही शाळेत जाता आले नाही. मी थेट दुसरीच्या वर्गात गेले आहे. यावर्षी, तरी शाळा सुरू व्हावी.
-सानवी पायमल, विद्यार्थिनी, मंगळवारपेठ.
विद्यार्थी हित लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू कराव्यात. शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.
-संतोष आयरे, शिक्षक, कागल.
कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी शाळा भरल्या नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सवय मोडली आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोना कमी होईपर्यंत ऑनलाईन शाळा सुरू कराव्यात.
-अभिजित सुतार, पालक, गोकुळ शिरगाव.
चौकट
ऑनलाईन पर्यायाचा विचार
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तरी त्याच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन स्वरूपात वर्ग भरविण्याचा विचार शैक्षणिक क्षेत्रात सुरू आहे.
फोटो (१४०५२०२१-कोल-अभिजित सुतार (पालक), संतोष आयरे (शिक्षक), सानवी पाटील (विद्यार्थीनी)
===Photopath===
140521\14kol_1_14052021_5.jpg~140521\14kol_2_14052021_5.jpg~140521\14kol_3_14052021_5.jpg
===Caption===
फोटो (१४०५२०२१-कोल-अभिजित सुतार (पालक), संतोष आयरे (शिक्षक), सानवी पाटील (विद्यार्थीनी)~फोटो (१४०५२०२१-कोल-अभिजित सुतार (पालक), संतोष आयरे (शिक्षक), सानवी पाटील (विद्यार्थीनी)~फोटो (१४०५२०२१-कोल-अभिजित सुतार (पालक), संतोष आयरे (शिक्षक), सानवी पाटील (विद्यार्थीनी)