कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वजण रात्रंदिवस राबत असले तरी अपेक्षित यश मिळत नाही. उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळेच कोविडबरोबरच नॉन कोविडच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेची यंत्रणा ढेपाळल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप महासभेत सदस्यांनी केले.
कोरोनाबाबतच्या प्रशासनाकडून करण्यात येत असणाऱ्या उपाययोजना आणि सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन नियोजनासंदर्भात महापालिकेची सोमवारी विशेष सभा झाली. उपमहापौर संजय मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सभा झाली.विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी म्हणाले, कोरोनाची महामारी वाढतच चालली आहे. आजी, माजी सदस्य पॉझिटिव्ह झाले असून, यामध्ये काहींचा मृत्यूही झाला आहे. अनेकांना बेड उपलब्ध होत नाहीत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यांची नेमकी गरज कोणाला आहे, ते कुठे उपलब्ध आहेत याची माहिती नागरिकांना मिळत नाही. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे.आयुक्त म्हणाले,
- सचिवांना इतर कोणतीही कामे दिली जाणार नाहीत.
- प्रभाग समिती आणखीन सक्षम करू, लोकप्रतिनिधींशी संवाद ठेवू.
- नवीन शववाहिकेसाठी निविदा प्रसिद्ध दहा दिवसांत येणार
- नागरिकांनी धाप लागल्यानंतर नको, लक्षण दिसताच तत्काळ तपासणी करावी,
- सीपीआरमध्ये आणखीन बेड उपलब्ध केले आहेत.
- आयसोलेशन येथे गर्दी कमी करण्यासाठी आणखीन चार ठिकाणी अँटिजेन टेस्ट केंद्र सुरू
- खासगी रुग्णालयात दुप्पटीने ११३६ बेड वाढविले.
- उपलब्ध बेडची माहिती दिली नाही, तर खासगी रुग्णालयांवर जबाबदारी निश्चित
- १२ तज्ज्ञ डॉक्टर, ४० नर्सची भरती,
- आणखीन एक ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू करणार
- ११ नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध