कोल्हापूर: गेल्या आठवडाभरापासून सातत्याने रोज एक हजारावर नवे कोरोनाग्रस्त आढळण्याला रविवारी कांहीसा ब्रेक मिळाल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला. रविवारी नवे ८१६ कोरोनाग्रस्त आढळले, तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.गेल्या रविवारपासून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची व मृतांची संख्या वाढतच चालली होती. शुक्रवारी याचा १२५० असा उच्चांक झाला होता. शनिवारी देखील ११२३ जण नवे कोरोनाग्रस्त आढळले होते. रविवारी मात्र हा वाढत चाललेला आलेख कमी आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ७८७ जण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ६६० जण उपचार घेत आहेत. कोल्हापूर शहरात १७७ अशी सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, तर शिरोळ तालुक्यात उच्चांकी ९३ रुग्ण सापडले आहेत. करवीर तालुक्यात ७८, तर हातकणंगलेत ६३ रुग्ण बाधित आढळले आहेत.हातकणंगलेत सर्वाधिक मृत्यूहातकणंगले तालुक्यात सर्वाधिक ८ मृत्यू झाले आहेत. करवीरमध्येही सात मृत्यू झाले आहेत, तर गडहिंग्लज, कागल, राधानगरी, चंदगड, गगनबावड्यात एकही मृत्यू झालेला नाही.चौकटमृतांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्तमृतांमध्ये चाळिशीच्या आतील मृत्यू झालेल्यांची संख्या वाढताना दिसत आहे. पाचगाव, कळंबा येथील पुरुष तर ३६ च्या आतील आहेत. हातकणंगले पारगाव येथील ३२ वर्षीय तरुण, इचलकरंजीतील ३५ वर्षीय, लातूर येथील ३८ वर्षीय, असे कर्ते तरुण डोळ्यादेखत कोरोनाने हिरावले आहेत.चौकटझालेले मृत्यू...कोल्हापूर शहर : राजारामपुरी येथील ५८ वर्षीय पुरुष, टाकाळा येथील ५८ वर्षीय महिला, रमणमळा येथील ६१ वर्षीय पुरुष, शुक्रवारपेठ येथील ७६ वर्षीय पुरुष.करवीर : पाचगाव येथील ४८ व ५५ वर्षीय पुरुष, सावर्डे येथील ४३ वर्षीय पुरुष, कळंबा येथील ३६ वर्षीय पुरुष, निगवे दुमाला येथील ६५ वर्षीय पुरुष, मोरेवाडी येथील ५८ वर्षीय पुरुष, हळदी येथील ७२ वर्षीय महिला.हातकणंगले : शिरोली येथील ५५ वर्षीय महिला, विक्रमनगर इचलकरंजी येथील ३५ वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर येथील ७५ वर्षीय महिला, इचलकरंजी येथील ४९ वर्षीय पुरुष व ७९ वर्षीय महिला, कबनूर येथील ६० वर्षीय महिला, नवे पारगाव येथील ३२ वर्षीय पुरुष, रुकडी येथील ५० वर्षीय पुरुष.शिरोळ : राजापूरवाडी येथील ८७ वर्षीय पुरुष, दत्तवाड येथील ६१ वर्षीय पुरुष.शाहूवाडी : येळवण येथील ४४ वर्षीय पुरुष, करंजोशी येथील ६३ वर्षीय महिला, भेडसगाव येथील ८४ वर्षीय पुरुष.आजरा : सरंबळवाडी येथील ४४ वर्षीय महिला, उत्तूर येथील ५५ वर्षीय पुरुष.भुदरगड : हंबरवाडी येथील ८५ वर्षीय पुरुष.पन्हाळा : वारणा कोडोली येथील ६५ वर्षीय पुरुष, पुनाळ येथील ६० वर्षीय पुरुष.सांगली : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील ६० वर्षीय पुरुष, स्टेशन रोड आरग मिरज येथील ७५ वर्षीय पुरुष, आटपाडी येथील ५४ वर्षीय महिला.सातारा : कऱ्हाड येथील ४७ वर्षीय महिला.लातूर : आंबुलगा येथील ३८ वर्षीय पुरुष.रविवार २ मेआजचे रुग्ण : ८१६एकूण मृत्यू : ३४जिल्ह्यातील मृत्यू : २९इतर जिल्हा मृत्यू : ०५उपचार घेत असलेले : ९६६०आजचे डिस्चार्ज : ७८७सर्वाधिक रुग्ण : कोल्हापूर शहरकोल्हापूर शहर : १७७शिरोळ : ९३करवीर : ७८हातकणंगले : ६३कागल : ५०चंदगड : ४१कोल्हापूर शहर मृत्यू : ०४तालुकानिहाय मृत्यू रुग्णकरवीर : ०७ ७८हातकणंगले : ०८ ६३भुदरगड : ०१ ४५पन्हाळा : ०२ २०शिरोळ : ०२ ९३आजरा : ०२ २७शाहूवाडी : ०३ ३५गडहिंग्लज : ०० ३७चंदगड : ०० ४१राधानगरी : ०० १३कागल : ०० ५०गगनबावडा : ०० २०कोल्हापूर महापालिका : १७७नगरपालिका : ७८इतर जिल्हा : ३९चौकटशनिवारीही ११२३ नवे रुग्ण, तर ३७ मृत्यूजिल्ह्यात चार दिवसांपासून हजारावर रुग्ण आढळण्याचा ट्रेन्ड शनिवारीही कायम राहिला. ११२३ नव्या रुग्णांची भर पडली, तर ३७ जणांना जीव गमवावा लागला. यात कोल्हापूर शहरातील २४२ सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. ७८० जण कोरोनामुक्त बनले असून ९ हजार ६६५ जण उपचार घेत आहेत.
कोरोनाचा दिलासा, नवे रुग्ण ८१६, मृतांचा आकडा मात्र वाढताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 11:42 AM
CoronaVIrus Kolhapur : गेल्या आठवडाभरापासून सातत्याने रोज एक हजारावर नवे कोरोनाग्रस्त आढळण्याला रविवारी कांहीसा ब्रेक मिळाल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला. रविवारी नवे ८१६ कोरोनाग्रस्त आढळले, तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.
ठळक मुद्देकोरोनाचा दिलासा, नवे रुग्ण ८१६, मृतांचा आकडा मात्र वाढताच आठवडाभरानंतर संख्या हजारच्या खाली्